-
An Island (ॲन आयलंड)
"सॅम्युअल प्रदीर्घ काळापासून एकटा राहिला आहे. ठरावीक कालावधीनं सामानाचा पुरवठा करणारी बोट आणि भूतकाळात मुख्य भूमीवरून आलेले सरकारचे प्रतिनिधी यांनीच केवळ इथं भेट दिली आहे. तो दीपस्तंभाची व्यवस्था पाहतो आणि आपल्या कोंबड्या सांभाळत किनार्यावर येणार्या लाटा बघत राहतो. मग एका सकाळी, त्याच्या सोबतीसाठी आणि त्याच्या एकांतवासाला धोका निर्माण करण्यासाठी समुद्र कुणाला तरी घेऊन आला असल्याचं त्याला आढळतं... अपराधभाव आणि भीती, मैत्री आणि नकार यांविषयीची; तसंच `घर` या संकल्पनेच्या अर्थाविषयीची उत्कट आणि प्रभावी कादंबरी. "
-
Bhavgiri (भावगिरी)
मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी कोकणी माणसं भुताला घाबरत नसली, तरी त्यांच्या सभोवतालचे जग व त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा-वेदना-दु:ख, काळजाला पीळ पाडते; कारण कोकणातील निसर्गसमृद्धी जरी आपल्याला वेड लावत असली, तरी परिस्थितीने गांजलेल्या माणसांची दुनिया तिथेही आहेच.गरिबीत दिवस काढूनही कोकणी माणूस काटेरी फणसासारखा आहे. वरून कठोर वाटला तरी त्याच्या हृदयात शहाळं असल्याची जाणीव कायमच दिसते. कोकण म्हणजे पिशाच्चांचं आगर समजलं जातं. मानवी प्रवृत्तीत जसा स्वार्थ-अधाशीवृत्ती दडलेली असते,तीच अतृप्त इच्छा मनात धरून भुतांच्या जगतातील विचित्र असे मानसिक व्रÂौर्य, बदला आणि अतृप्त आत्म्यांची घालमेल कोकणकथांतून आपल्याला दिसते. भावगिरी पर्वताचे दर्शन मनाला मोहवणारे, त्यामुळे माणूस कोकण प्रेमात पडला नाही तर नवलच! येथील जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयता, गूढगुंजनात्मकता कोकणचे गाणं बनते... मनात रुंजी घालते. ‘भावगिरी’ पर्वताशी केलेलं हे हितगुज म्हणजे आपल्या गावातील मातीशी असलेलं विश्वासाचं घट्ट नातं!
-
Room Number 312 Aani Itar Katha (रूम नंबर ३१२ आणि
देशभरातील नामांकित लेखकांनी लिहिलेल्या १९ खुमासदार कथांचा हा संग्रह. कथानकांमधले अजब ट्वीस्ट आणि रंगत प्रत्येक कथेत अनुभवास येते. मैत्री, नातेसंबंध, भयपट आणि अशाच गमतीशीर रोमांचित करणाऱ्या या कथा आहेत.
-
Amir Khusro (अमीर खुस्रो)
तेराव्या शतकातील भारतीय कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो. सुलतान जलालुद्दीन खिलजीने खुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्यांना `अमीर` हा किताब दिला. या अमीर खुस्रो यांची जीवनकथा उलगडणारे पुस्तक म्हणजे मिलिंद जाधव यांची ही नवी कादंबरी `अमीर खुस्रो`. खुस्रो यांचा जन्म सध्याच्या पंजाबातील पतियाळा येथे झाला. खुस्रोनी फारसी, हिंदवी आणि उर्दू मध्ये काव्यरचना व लिखाण केले. ते उर्दू भाषेतील पहिले कवी. खुस्रो उत्तर भारतीय संगीतातील खयाल गायकीचे, कव्वाली रचनांचे आणि गझल या काव्यप्रकाराचे जनक मानले जातात. खुस्रो दिल्लीच्या तत्कालीन सात सुलतानांचे दरबारी जाणकार, संगीतकार होते. मिलिंद जाधव यांनी खुसरोंच्या जीवनपटासोबतच तेव्हाच्या काळाला देखील वाचकांसमोर उभे केले आहे. खुस्रो यांच्या मूळ लेखनाच्या बरोबरीने त्या लेखनाची प्रक्रिया, खुस्रो यांचा दरबार, समाज आणि वैयक्तिक आयुष्यतील वावर, त्यांनी केलेल्या चर्चा, टीका यांचा समावेश कथानकात केला आहे. तत्कालीन उर्दू, हिंदवी भाषेचा लहेजा वापरत कादंबरीची भाषा नटवली आहे.
-
Manasa Ashi Aani Tashihi (माणसं अशी आणि तशीही)
माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, िंचतावणारी, खंतावणारी, दुसर्याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी.
-
Dnyanasuryache Akash-Sant Nivruttinath (ज्ञानसूर्य
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात. निवृत्ती हे ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरू, तसेच सोपान-मुक्ताईचेही मोठे बंधू. त्यामुळे या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात; पण त्या घटनांकडे पाहण्याचा निवृत्तिनाथांचा दृष्टिकोन, भावंडांवर मायेची पाखर घालणं, ज्ञानदेवांचं गुरूपद स्वीकारणं इ. बाबींतून निवृत्तिनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या कादंबरीतून उलगडत जातात. निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या चार अलौकिक मुलांना जन्म देणार्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचे ज्येष्ठ अपत्य म्हणून निवृत्तिनाथांचा जन्म होणं आणि तीन भावंडांना सामधिस्थ होताना त्यांना पाहावं लागणं, नाथपंथाची दीक्षा घेऊनही विठ्ठलभक्ती आणि भागवत धर्माशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेणं, हेच निवृत्तिनाथांच्या जीवनातील वेगळेपण ही कादंबरी अधोरेखित करते.
-
Eden (ईडन)
ईडन एका अनोख्या भारतीय प्रिझममधून अब्राहमिक मिथकांच्या विशाल जगाचा शोध घेते, जिव्हाळ्याच्या, पण अपमानास्पद नसणाऱ्या अशा कथाकथनाद्वारे आणि वाचकांना देवदूत, राक्षस, संदेष्टे, कुलपिता, न्यायाधीश आणि राजांच्या अनेक मोहक कथांचा परिचय करून देते. हे मेसोपोटेमियन, इजिप्शियन आणि झोरोस्ट्रियन पौराणिक कथांच्या कथा देखील सांगते ज्यात पुढे अब्राहमिक एकेश्वरवादाचाही उल्लेख येतो. जगभऱच्या धर्माधारित कल्पनांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकातून अनुभवता येतो.
-
Tawaifnama (तवायफनामा)
म्हटलं तर त्या मनस्वी कलाकार. साधनेचा सोस बाळगून कलेवर हुकूमत गाजवणाऱ्या रागरागिणी. पण काळओघात त्यांचं अवमूल्यन होत गेलं. एका समृद्ध परंपरेला नैतिकानैतिकतेच्या संकोची चौकटीत बसवलं गेलं. आणि अभिजात संगीत आणि नृत्यातल्या या सम्राज्ञी काळाच्या उदरात नामशेष होत गेल्या. हा प्रदीर्घ आणि जीवाला चटका लावणारा प्रवास सबा दिवाण लिखित ‘तवायफनामा’ पुस्तकातून वाचकांच्या भेटीस येतो. ज्यात बनारस आणि भभुआतल्या तवायफ कुटुंबाचा तब्बल शतकाहून अधिक काळाचा पट समोर येतो. १८५७च्या उठावात प्राणांची बाजी लावणाऱ्या धरमनबीबीपासून सदाबहार, गुलशन, उमराव, तीमा ते अलीकडच्या काळातील हिंदू-मुस्लिम तिढ्यात हकनाक वेदना सहन करणाऱ्या तवायफांच्या जगण्याचा आलेख पहायला मिळतो. शमादानच्या मंद उजेडासारख्याच यांच्या कथा अस्वस्थ करत राहतात आणि यातल्या पानागणिक ठुमरीचे आर्त स्वर खोल जखम करत राहतात.
-
Chamblechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)
महादजी शिंदे...दौलतीची निरपेक्ष सेवा करणारे...अंतर्गत बंडाळ्यांमुळे व्यथित होणारे...राघोबादादांचा बिमोड करण्यासाठी, इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी, मोरोबा आणि बापूंचा नानांना गोत्यात आणण्याचा डाव उधळण्यासाठी, करवीरकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नानांच्या मदतीला धावलेले ...नानांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य न देता उलट महादजींचा द्वेष करूनही उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारे...कवायती फौज पदरी बाळगणारे...नानांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना उघडउघड शह देणारे...सवाई माधवरावांच्या पायी निष्ठा वाहणारे... इंग्रजांना शरण यायला भाग पाडणारे...भाऊसाहेब तोतया प्रकरणात मदतीला धावणारे...अहिल्याबाईंच्या विरोधात राघोबादादांना साथ देण्यास स्पष्ट नकार देणारे...नानांना दिलजमाई करण्यास भाग पाडणारे...दिल्लीच्या बादशहाला त्याच्या तख्तावर परत नेऊन बसवणारे... अशा महादजींच्या पराक्रमाची आणि स्वामिनिष्ठेची धगधगती कहाणी
-
Mazadache Jadugar (माझदाचे जादूगार)
"‘माझदाचे जादूगार’ ह्या पुस्तकाचं कथानक भूतकाळातून आणि विविध भौगोलिक वैशिष्ट्यांच्या प्रदेशातून वेड्यावाकड्या पद्धतीनं वाट काढत प्रवास करतं. हे कथानक, इस्लामिक जिहादचा कालखंड, मॅसिडोनियन सूडाचा कालखंड, अकिमेनिड साम्राज्याच्या वैभवाचं युग, प्रेषिताच्या जन्माचं युग, आर्यांमध्ये पडलेल्या फुटीचा कालखंड ... अशा कित्येक कालखंडांमधून चित्तथरारक प्रवास करत, अखेरीस ह्या सगळ्याची जिथून सुरुवात झाली होती, तिथे ... म्हणजेच वेदकालीन उगमापाशी येऊन पोचतं. ही अश्विन सांघी यांची आतापर्यंतची सर्वात प्रक्षोभक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी आहे. "
-
The Princess (द प्रिन्सेस)
भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच्या संस्थानिकांच्या मानसिकतेचं चित्रण ही कादंबरी करते. त्या निमित्ताने त्या वेळचा संस्थानांचा कारभार, संस्थानिकाच्या पत्नीचं जीवन, संस्थानांमधील सामाजिक-सांस्कृतिक जीवन, तिथल्या चालीरीती, त्यांचा डामडौल इ. वर्णन या कादंबरीत येतं. दादा हे बेगवाड या छोट्याशा संस्थानाचे अधिपती. संस्थानिक असल्याचा अभिमान त्यांच्या नसानसांत भिनलेला असतो. त्यांचा मुलगा अभय लहानपणापासून संस्थानिक वातावरणात वाढलेला असतो. दादांचं आणि अभयचं वैवाहिक जीवन, त्यांची अंगवस्त्रं याच्या चित्रणातून संस्थानांमधील स्त्री-जीवन समोर येतं. हिंदुस्थानातून ब्रिटिशांची सत्ता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना संस्थानांचं अस्तित्व राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होतो आणि दादांमधला कट्टर संस्थानिक अस्वस्थ होतो. अभय मात्र होणार्या बदलांना सामोरा जायला तयार असतो. दादा हे बदल स्वीकारतात का? संस्थानांचं आणि संस्थानिकांचं प्रातिनिधिक, सर्वांगीण चित्रण करणारी कादंबरी.
-
Upchar Tan Manache (उपचार तन मनाचे)
सर्वांगीण विचार करता असे दिसते की, वैद्यकशास्त्राकडे पाहण्याच्या आधुनिक भौतिक विचारपद्धतीमुळे आपण जे काही करू शकतो, ते केवळ चमत्कार या श्रेणीत बसवावे असेच असते. प्रतिजैविके वापरून आपण जंतुसंसर्ग नाहीसा करू शकतो, रासायनिक उपचारांनी कर्करोगावर उपचार करू शकतो, पोलिओ, गोवर, कांजिण्या यांच्यापासून तसेच काही प्राणघातक रोगांपासून मुलांना वाचवू शकतो, रोगग्रस्त अवयव बदलू शकतो. मात्र, आपले मन हे सगळ्या रोगांवरचा रामबाण उपाय आहे; तसेच आपला आत्मविश्वास आणि आशा औषधापेक्षा अधिक चांगले कार्य करतात. साहजिकपणे आपले शरीर विविध रोगांसंदर्भात आणीबाणीचा सामना करत असताना आपल्यावर कमी ताण येतो आणि आपले शरीर स्वत:ची दुरुस्ती आणि वाढ यांच्याकडे अधिक लक्ष पुरवते. या एकाच मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे त्यांनी अनेक रोगांवरील नानाविध उपचारपद्धतींचा सखोल अभ्यास केला. मन आणि शरीर यांच्यावर एकत्रितपणे केल्या जाणार्या उपचारांबद्दल मिळालेली ही समग्र माहिती त्यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणली आहे.
-
Man Vs Ocean (मॅन Vs ओशन)
"वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात अपयशी, असमाधानी असणार्या अॅडमला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या होती. जीवनाला काहीतरी अर्थ द्यायचा होता; पण त्याला त्याचे ध्येय सापडत नव्हते आणि एका विमान प्रवासामध्ये अचानक त्याला ते सापडले. विमानप्रवासामध्ये ‘ ON A CLEAR DAY’ हा एका जलतरणपटूच्या इंग्लंडची खाडी पोहून जाण्याच्या प्रयत्नावर आधारित सिनेमा त्याच्या बघण्यात आला आणि त्याला त्याचे ध्येय सापडले. त्यानंतर इंटरनेटवर शोध घेत असताना ‘स्टीव्ह मुनाटोन्स’ या अमेरिकन जलतरणपटूने त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर निवडलेल्या जगातील सर्वांत अवघड अशा, ज्याची तुलना गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील सात उत्तुंग शिखरे चढून जाण्याशीच होऊ शकेल, अशा समुद्रातील सात आव्हानात्मक पोहण्याच्या जागांचा त्याला शोध लागला आणि त्याला त्याचे नेमके ध्येय सापडले. ही अॅडम वॉकरच्या जिद्दीची, सात समुद्री साहसांची, उत्कंठावर्धक आणि एक वेगळाच अनुभव देणारी कहाणी आहे."
-
Freedom On Fire (फ्रीडम ऑन फायर)
या कथासंग्रहातील सातही कथा रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या वर्तमान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आहेत. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील अभिनेत्री / मॉडेल बार्बारा देशप्रेमाने भारून, युद्धात उतरून, रशिया-युक्रेन युद्धावर आधारित सिनेमाची निर्मिती करते; पण... ‘लव्ह, वॉर अॅन्ड...?’मधील घटस्फोटित अँजेलिना आणि सैनिक असलेल्या बोरिसचं वैवाहिक आयुष्य एक दिवसाचं ठरतं. बोरिस मारला जातो युद्धात; पण त्याचा वंश वाढत असतो अँजेलिनाच्या पोटात. मग अँजेलिनाच्या मनात पडतं महाकादंबरीचं बीज... ‘फ्रीडम ऑन फायर’मध्ये इगोर आणि सोफिया या पिता-पुत्रीच्या आंधळ्या रशियानिष्ठेला दिमित्री हा इगोरचाच मुलगा दाखवतो युक्रेनमधील विध्वंसाचा आरसा आणि मग सोफिया जाग आणू पाहते रशियनांना... ‘सच ए लाँग जर्नी’ मध्ये भारतीय शिवच्या मनात पाकिस्तानविषयी असलेल्या अढीमुळे माहजबिन ऊर्फ मून या पाकिस्तानी मुलीची दोस्ती स्वीकारायला तो तयार नसतो; पण युक्रेनमधील युद्धामुळे आपापल्या मायदेशी परतत असतानाच्या प्रवासात शिवचं मनपरिवर्तन होतं...रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनात उठलेल्या भावनिक/मानसिक संघर्षाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या उत्कट कथा THE RUSSIA-UKRAINE WAR HAS UNSETTLED THE ENTIRE WORLD. IN THIS LONG STRUGGLE, A SMALL COUNTRY LIKE UKRAINE IS PUTTING ALL THE EFFORTS. THESE STORIES HIGHLIGHT THE COURAGEOUS CITIZENS OF THIS COUNTRY AND THEIR STRUGGLE.
-
Pais Pratibhecha (पैस प्रतिभेचा)
प्रतिभाताईंच्या कल्पनाविश्वाला भविष्याचा वेध घेण्याची आस तर आहेच; तथापि सतत प्रगतिपथावर असणाऱ्या विज्ञानयुगातल्या माणसाचं पुढे काय होणार याची उत्सुकता आणि काळजीही आहे. त्यांच्या विचारविश्वात विचारवंत, सुधारक, शास्त्रज्ञ, पराक्रमी स्त्रिया, विद्वान स्त्रिया, पिचलेली, नियतीला शरण जाणारी माणसं, धर्म, संस्कृती, कला, निसर्ग हे सगळं आणि त्याशिवाय अजूनही बरंच काही शतपावली घालत असतं. म्हणूनच ताईंशी गप्पा मारणं हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो.
-
Mi Sakha Meghdoot (मी सखा मेघदूत)
कविकुलगुरू कालिदासाचे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य म्हणजे अभिजात गीर्वाणभाषेचा एक अनुपम अलंकार! पत्नीच्या विरहाने व्याकुळलेल्या यक्षाने आपला संदेश घेऊन एका मेघालाच रामगिरीहून अलकानगरीकडे जाण्याची विनवणी केली. यक्षाने या आपल्या दूताला त्याच्या प्रस्तावित प्रवासपथाचे वाटेतल्या सार्याा खाणाखुणांसकट मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हा मेघदूत अलकानगरीला पोहोचला का? त्याला ती यक्षपत्नी भेटली का? तिने या दूताकडे आपल्या पतीसाठी-यक्षासाठी काही सांगावा धाडला का? या सार्यांवची उत्तरे सांगत आहेत हर्षदा पंडित. कालिदासाच्या ‘मेघदूता’चा जणू ‘सिक्वेल’ म्हणजे – मी सखा मेघदूत
-
Ek Zunj Gongatashi (एक झुंज गोंगाटाशी)
हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही. अतिक्रमणं करणार्याप आणि जमिनी बळकावणार्या लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणार्याो वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी –
-
Aarthik Gunhegariche Antarang (आर्थिक गुन्हेगारीचे
दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये! या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा वैâक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन, आयएल अँड एफएस अशा लबाड कंपन्यांनी. सत्यम कॉम्प्युटर्सचा रामलिंग राजू : एकेकाळचा ‘सिकंदराबादचा बिल गेट्स' अन् तेलगू अस्मितेचं प्रतीक, स्वत:च्याच कंपनीत फ्रॉड करून तुरुंगात गेला! कसे घडतात हे आर्थिक घोटाळे? कसे सापडतात त्यांचे सूत्रधार? आर्थिक गुन्ह्यांचं गुंतागुंतीचं विश्व सोप्या भाषेत उलगडून दाखवलंय, शोधक वृत्तीच्या नि भेदक नजरेच्या एका तरुण फोरेन्सिक ऑडिटरनं...
-
Gata Rahe (गाता रहे)
संगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - ‘धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, ‘आपले' असो वा ‘त्यांचे', शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -
-
Wani Ani Lekhani (वाणी आणि लेखणी)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन'. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस'चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी... अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणार्यान दिलीप माजगावकरांची स्वत:ची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं : अंतरीचे उमटे बाहेरी... व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी