-
Jagala Pokharanari Davi Valavi (जगाला पोखरणारी डाव
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणाऱ्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा.
-
JRD - Ek Chaturastra Manus (जेआरडी - एक चतुरस्त्र
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला. नीतीमूल्यांची बूज राखत व्यवहार, उद्योग चालवणारे हात अन् मने जपणे, समाजातून मिळवलेली संपत्ती समाजाच्या विकासासाठी वापरणे, उद्योग उभा असलेल्या परिसराचा विकास ही टाटा उद्योगसमूहाची संस्कृती आहे. नव्याचे स्वागत करत जेआरडींनी अनेकजणांना घडवले, नव्या वाटा खोदल्या, नवे मापदंड निर्मिले. त्यांना लाभलेला उज्ज्वल वारसा, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, नवे आयाम मिळत विकसित झालेले त्यांचे समृद्ध, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व याची ओळख या पुस्तकातील लेख करून देतात. विशेषत: अनेकविध भूमिकांना पुरून वर दशांगुळे उरणारा त्यांच्यातील सहृदय, रसिक, संभाषण चतुर, आनंदी ‘माणूस’ वाचकाला अधिक भावतो.
-
Lok Maze Sangati Bhag-1 Aani 2 (लोक माझे सांगाती भ
“ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचामी आपल्या साडेपाच दशकांच्यासार्वजनिक जीवनात काम करतानावारंवार अनुभव घेतला आहे.या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला,यापेक्षा अधिक काय असू शकतं?”शरद पवारगेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीतमहत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेलाआपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
-
Lt Colonel Purohit -Vishvasghatacha Bali (लेफ्ट क
‘हा हिंदू वहशतवाद आहे,’ अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून उच्चरवाने सांगितल्या जात होत्या. राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच एखाद्या आर्मी ऑफिसरला. लेफ्ट, कर्नल पुरोहित यांना सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक झाली होती. कोण होती ही व्यक्ती आणि तिचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर का चिकटवलं गेलं होतं? सर्वांना सोडून याच व्यक्तीला का बरं यात गोवलं गेलं होतं? ते खरोखर गुन्हेगार होते का? की त्यांना षड्यंत्रात गोवलं गेलं होत? त्यांना बळीचा बकरा बनवलं गेलं होतं का? न्यायालयात खटले चालू असतानाच्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या मानचिन्ह विभूषित अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं गेलं होतं; त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली होती? ‘लैफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?’ या पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना, भयाण अशा षड्यंत्रावर प्रकाशझोत टाकलेला आहे. ते सर्व वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहील.
-
Karheche Paani (Sankshipt) कऱ्हेचे पाणी (संक्षिप्त
जविनायें हैं विलक्षण पेड माझ्यामद्धे कसे आहे? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडडूंतून उगम पावलेल्या कन्हेच्या कोठी मी जन्माना आलो आणि तिच्याल अंगाखांद्यावर जेजूरांच्या खंडोबा च्या भंडाऱ्याने वाढलो. मोठा झालो. उशालाशिव छत्रपतचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पारा करी तर श्रीसोपानदेवांची भक्तिवीणा शेजारीं सदैव वाजे.
-
Replay (रिप्ले)
"अॅन्ड्र्यू स्टिलमनचा खून झाल्यापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. २०१२ च्या ९ जुलैच्या सकाळी, न्यू यॉर्क टाइम्सचा शोधपत्रकार अॅन्ड्र्यू स्टिलमन हडसन नदीच्या भागात जॉगिंगसाठी गेल्यावर त्याच्या पाठीच्या खाली अचानक तीव्र वेदना त्याला जाणवते. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळतो. त्याची शुद्ध परत येते तो दिवस असतो ७ मे, २०१२– म्हणजे दोन महिने आधीचा. त्याचा मृत्यू व्हावा आणि का व्हावा, असं कुणाला वाटतं, याचा शोध घेण्यासाठी अॅन्ड्र्यूकडे आता बासष्ट दिवस उरले आहेत. त्याचं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याला एक संधी आहे. न्यू यॉर्क सिटी ते ब्यूनॉस आयरिसच्या प्रवासात अॅन्ड्र्यूची काळाविरुद्धची शर्यत वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. कौशल्यपूर्ण रचना असलेली आणि चातुर्यानं सांगितलेल्या या रोमांचक कहाणीचे लेखक आहेत फ्रान्सचे सर्वांत लोकप्रिय समकालीन कादंबरीकार. कथेचा शेवट अविस्मरणीय रीतीनं करतात. "
-
Heads You Win (हेड्स यु विन)
अलेक्झांडर कारपेन्कोला बालपणापासूनच स्पष्ट दिसत असतं की, तो देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे; पण राज्य वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांची ‘केजीबी’द्वारे हत्या होते, तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या आईबरोबर रशियातून पळ काढावा लागतो. गोदीवर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात – त्यांनी अमेरिकेला जाणार्या जहाजाच्या कंटेनरमध्ये चढावं की ग्रेट ब्रिटनला जाणार्या, याची निवड अलेक्झांडर नाणं उडवून करतो... एका क्षणात, अलेक्झांडरच्या भविष्याला दुहेरी कलाटणी मिळते. दोन खंड आणि तीस वर्षांच्या काळाची व्याप्ती असलेल्या या भाग्य आणि भविष्याच्या दंतकथेमध्ये, एक स्थलांतरित म्हणून नवीन जगावर राज्य करण्याच्या त्याच्या जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर आपणही स्वार होतो. अलेक्झांडरची ही अद्वितीय कथा उलगडत असताना, आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याची त्याला जाणीव होते आणि शेवटी रशियातील भूतकाळ आपली पाठ सोडणार नाही, हे तो स्वीकारतो.
-
Ice Station Zebra (आइस स्टेशन झेब्रा)
ही एक रहस्यकथा/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी `यूएसएस डॉल्फिन`वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?
-
Telgi Scam Reporter Chi Diary (तेलगी स्कॅम रिपोर्ट
"एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते. एका मागोमाग नवनवी नावं गुंफली जातात. राजकारण, पोलीस, प्रशासन, माध्यमं आणि सामान्य जनता या सगळ्यांना हादरवून टाकणारा हा महाघोटाळा. बनावट स्टॅम्पच्या धंद्यातून त्यानं निर्माण केलेली एक समांतर यंत्रणा आणि त्याचे भयंकर परिणाम, हे सगळं नंतर उघड्यावर आलंच. भारतीय दंड संहितेनुसार त्याला शिक्षाही झाली. पण हा संपूर्ण घोटाळा आणि त्याचं शोधपत्रकारितेच्या अनुषंगाने एका पत्रकारानं धुमाकूळ उडवणारं केलेलं संशोधन यांची ही रोचक आणि आश्चर्यचकित करणारी कहाणी. जी सोनी ‘SCAM 2003 : THE TELGI STORY’ या मालिकेतून सिनेजगतातही धुमाकूळ घालत आहे."
-
The Elephant Whisperer (द एलेफन्ट व्हिस्परर)
"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे. आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल. "