-
Deonarcha Dongar Ani Farzana (देवनारचा डोंगर आणि फ
एका बाजूला चंगळवादात बुडालेला झगमगता श्रीमंती थाट जोपासणारं एक जग आणि दुसऱ्या बाजूला उपभोगाला प्राधान्य देणाऱ्या वापरा आणि फेका संस्कृतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यालाच उपजीविकेचं साधन बनवणाऱ्यांचं एक बकाल जग. मुंबईसारख्या शहरांचं हे दुभंगलेपण आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. परंतु यातल्या बकाल जगातील माणसांचं जगणं तितकंसं जवळून पाहायला मिळत नाही. देवनारचा कचरा डेपो आणि त्यावर जगणाऱ्या माणसांमध्ये तब्बल दहा वर्षे काम करून अनुभवलेलं एक दुर्लक्षित जग पत्रकार असलेल्या सौम्या रॉय यांनी आपल्यासमोर उलगडलं आहे. शहराच्या बकालीकरणात भर घालणारा, मानवी आरोग्य धोक्यात आणणारा हा कचरा डेपो बंद करावा म्हणून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणि त्याचवेळी 20 मजल्यांची उंची गाठलेल्या कचऱ्याच्या डोंगरावर शहरातली जमा केलेली घाण घेऊन येणाऱ्या ट्रक्सच्या मागे धावणाऱ्या कचरावेचकांचा सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष यातल्या विरोधाभासाचं चित्रण आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतं. ‘माउंटन टेल्स" या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद वाचकांना अस्वस्थ तर करेलच परंतु मानवानेच निर्माण केलेल्या प्रश्नांकडे बघण्याची नवी दृष्टीही देईल.
-
Mahajalache Muktayan (महाजालाचे मुक्तायन)
‘चित्तो जेथा भोयोशून्यो’ या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणार्याी या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय, सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
-
Asahi Ek Kimayagar (असाही एक किमयागार)
एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते हणमंतरावांचे मुख्य ध्येय आहे की, जितके शक्य आहे, तितके समाजाचे हित करण्याचा प्रयत्न करायचा. ते नेहमी म्हणतात की, त्यांना दहा कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे; आणि ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यातून लवकरच आपले ध्येय गाठतील. नुसते उपदेश देऊन नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या वागणुकीतून अनेकांना काम करण्याची प्रेरणा दिली आहे. अनेक तरुणांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत केली आहे.
-
Rakhetun Ugavatikade (राखेतून उगवतीकडे)
ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
-
Shwas (श्वास)
श्वासतज्ज्ञांच्या वैज्ञानिक प्रयोगावर आणि श्वासासंबंधिच्या प्रचलित सिद्ध पद्धतींवर आधारित * प्रत्येकाने वाचायलाच हवं असं पुस्तक. मला खात्री आहे की, हे पुस्तक प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल घडवेल. - शंकर महादेवन, सुप्रसिद्ध गायक * श्वासाशिवाय जीवन नाही, बासरी पण नाही. मला आनंद होतोय की, श्वास या विषयावरील जगप्रसिद्ध पुस्तक मराठीत आलं आहे. - राकेश चौरसिया, सुप्रसिद्ध बासरीवादक - * संगीतात आणि जीवनात श्वासाचं महत्त्व हे वादातीत आहे. ज्यांना श्वासाचं विज्ञान समजून घ्यायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. - आशा खाडिलकर, ज्येष्ठ गायिका * तुम्ही काय खात आहात, तुम्ही किती व्यायाम करता, तुम्ही किती स्लिम किंवा तरुण आहात किंवा स्मार्ट आहात याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही नीट श्वास घेत नसाल तर यापैकी कशाचाही उपयोग होणार नाही.
-
Rashtriya Swayamsevak Sangh (राष्ट्रीय स्वयंसेवक स
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ 1925 साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नव्वद वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. केवळ देशातच नाही, तर जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये संघ कार्यरत आहेच. इतकेच नाही, तर परदेशातील भारतीयांना आपल्या देशाशी, संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही संघटना नाही, तर परंपरा बनलेली आहे.
-
Gulzar Patkatha-Mere Apne,Parichay,Koshish (गुलज़ार
गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला. गुलजारांच्या लेखनीतून 19 पटकथा अवतरल्या, ज्यांना पडद्याचा दृश्यरुपी आयामही स्वतः गुलजारांनीच दिला. या कथांमध्ये निव्वळ रुपेरी पडद्यावरचं नाट्य नव्हतं, तर त्यात प्रगल्भ साहित्यमुल्य होतं. म्हणूनच या कथा रसिकवाचकांना परकायाप्रवेशाचा परम आनंद देऊ शकतात. यात मेरे अपने, परिचय, कोशिश,अचानक,आंधी,किताब,खुशबू,मीरा,मासूम,मौसम,अंगूर,लिबास,लेकिन,हुतूतू,माचिस,इजाजत,न्यू देहली टाईम्स, नमकिन आणि किनारासारख्या पटकथांचा समावेश आहे. सामाजिकतेच्या चक्रात बाधित होणाऱ्या नातेसंबंधांचं प्रतिबिंब या कथांमध्ये उतरतं. भावनांमधला सच्चेपणा आणि राजकारणानं ग्रासणारं प्रेम यात भेटतं. लिबासमध्ये विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी नातेसंबंधांची घालमेल दिसते. तर मासूममध्ये अशाच प्रकारच्या संबंधांमुळं होरपळलेल्या चिमुरड्यांचं भावविश्व दिसतं. माचिसमध्ये दहशतवादाशी लढा देणारा पंजाबी तरुण भेटतो, तर हुतूतूमध्ये देशाला ओरबाडणाऱ्या भ्रष्टाचाराचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. मुकबधिरांचा संवादासाठीचा कोशिशमधला संघर्ष डोळ्यात अंजन घालतो तर शेक्सपिअरच्या द कॅमेडी आफ एरर्सवर आधारलेला अंगूर निर्मळ विनोदाची यथेच्छ अनुभूती देतो.
-
Gulzar Patkatha-Meera,Angoor,New Delhi Times (गुलज़

Gulzar Patkatha-Aandhi,Achanak,Kitab,Mausam (गुलज़ा