-
Vimuktayan (विमुक्तायन)
‘विमुक्तायन’ हे लक्ष्मण माने लिखित संशोधनात्मक पुस्तक असून, महाराष्ट्रातील भटक्या व विमुवत जमातींचा चिकित्सक पध्दतीने केलेला हा अभ्यास. लेखकाने पहिल्या प्रकरणातून विमुक्त जमातींचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडला आहे. दुसर्या प्रकरणातून भटक्या गुन्हेगार जमातींचा जीवन संघर्ष, तंटे-बखेडे, सामाजिक जीवनाचा धांडोळा घेतला आहे. तिसर्या प्रकरणांतून महाराष्ट्रातील विमुक्त जमातींची सामाजिक व आर्थिक स्थिती,जात परंपरा,विवाह,विधवांचे पुनर्विवाह,जातपंचायत इ.चा ऊहापोह केला आहे, शेवटच्या व चौथ्या प्रकरणातून-भटक्या-विमुक्तांसाठी शासनाने केलेल्या उपाययोजना,त्यांचे मनाचा थरकाप उडविणारे,परिघाबाहेरचे जीवन, जातपंचायतींचे वाढते प्रस्थ, परिशिष्टे, नकाशे, प्रत्येक जात व पोटजातींच्या माहितीचे टेबल इ.माहिती सखोल अभ्यास करून सुस्पष्टपणे दिली आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे,‘काटेरी कुंपणा’तील रक्तबंबाळ झालेल्या जीवांची मुक्तता म्हणावी असेच. म्हणूनच मानवतेच्या कार्याचा सजगतेने,संवेदनशीलपणे केलेला हा अभ्यास म्हणजे श्रेष्ठ पुरस्कार ठरणारे, ‘विमुक्तायन’ हे पुस्तक होय
-
Astitvancha Utsav (अस्तित्वाचा उत्सव)
‘ईशावास्य उपनिषद’ हे फक्त अठरा श्लोकांचं छोटसं उपनिषद आहे. ईशावास्य उपनिषदांत अस्तित्वाचा उत्सव करण्याची कला ऋषींनी दाखविली आहे. परम लयेश्वर अशा कृष्णलीलेच्या प्रेमलीलांनी आणि रहस्यांनी भरलेलं ‘कॉस्मिक काव्य’ म्हणजे ईशावास्य उपनिषद! या उपनिषदातील आयुष्य व्यापून टाकणारी लय हे पुस्तक अधोरेखित करतं.
-
I Can See You (आय कॅन सी यू)
एकामागोमाग एक सहाजणींचे खून पडलेत...या सहाहीजणी शॅडोलॅन्ड या व्हर्च्युअल जगाशी निगडित असतात, जिथे त्या वेगळ्या नावाने वेगळ्या अवतारात वावरत असतात...सहाही जणींचा खून एकाच पद्धतीने झाला आहे...अॅब्बॉटच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्टिव्ह नोआह आणि जॅक खुन्याचा माग काढू पाहत आहेत...पण तो गुंगारा देतोय...शॅडोलॅन्डचा अभ्यास करणारी इव्हही त्यांना सहकार्य करते आहे...सहा वर्षांपूर्वी निर्घृण हल्ला होऊनही त्याच्यातून बचावलेली इव्ह आणि अपघातात आपली पत्नी आणि मुलगा गमावलेला नोआह यांच्यात प्रेमबंध निर्माण झालाय...डेलला नोआह, जॅक आणि इव्हचा बदला घ्यायचाय...त्याच्याकडे संशयाची सुई आहेच...पण त्याला अटक केल्यावरही खुनांचं सत्र सुरू राहतं...खुन्याचं मुख्य लक्ष्य आहे इव्ह आणि नोआहही...तो इव्हचं अपहरण करतो...कोण आहे हा विकृत खुनी? इव्ह सुटते का त्याच्या तावडीतून? थरारक घटनांनी भरलेली, धक्कादायक वळणांनी पुढे सरकत राहणारी उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी.
-
Kinare Manache (किनारे मनाचे)
बाईंच्या दीर्घकालीन काव्य प्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने घेतलेला वेध गेल्या अर्धशतकापासून शांताबाई काव्य लेखन करीत आहेत.इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वात आवडती निर्मिती राहिली आहे.`किनारे मनाचे` हा शांता बाईंच्या दीर्घकालीन काव्याप्रवासाचा चीकीत्सतपणे आणि सहृदयेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे.सुप्रसिद्धी कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ.प्रभा गणोरकर यांनी शांत बाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखविला आहे.तिचा आशय,अविष्कार,भाषेचे पोत,तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती,त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण,मुलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ.गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल.एका जेष्ठ कवयित्रींचा या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाच्या हि सर्वांगीण समीक्षा काव्यासारीकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उतबोधक वाटेल.
-
Tila, Tila Dar Ughad (तिळा,तिळा दार उघड)
आपले भविष्य आपल्या हाती आहे, याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काहींना हे माहीतच नसते. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला शरण जाण्याचा मार्ग ते अवलंबतात. खरे तर प्रत्येक माणूस हुशारी, बुद्धिमत्ता घेऊनच जन्माला येतो; पण नंतर आपण परिस्थिती, इतर लोकं, अनुभवाचे ओझे बाळगत जीवन कंठतो. आपली अलौकिक बुद्धीमत्ता, कौशल्य सर्व अडगळीत पडते. आपल्यातील हा सुप्त खजिना बाहेर कसा काढावा, हे सायमन टी. बेली यांनी 'रिलीज युवर ब्रिलीयन्स'मधून सांगितले आहे. याचा मराठी अनुवाद तिळा तिळा दार उघड या नावाने प्रमोद शेजवलकर यांनी केला आहे. कार्बनच्या दगडतून तयार झालेल्या खड्ड्यातून हिरा घडविला जातो, त्याप्रमाणे मातीतील सुप्त गुण बाहेर येण्याची आपला विचारम् दृष्टिकोन बदलणे आवश्यक असते. आपल्या हुशारीला बुद्धिमत्तेची धार येण्यासाठी स्पष्टता, श्रद्धा, धाडसी योजना व अंतिम स्वप्न या टप्प्यातून जावे लागते. ते कसे जायचे व त्यासाठी काय करावे, याविषयी यात मार्गदर्शन केले आहे. आयुष्याचा कायापलट घडविणारी ही चारसूत्री अमलात आणणे आवश्यक आहे.
-
Mahasamrat Rankhaindal Khand 2 (महासम्राट रणखैंदळ
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!
-
Gopichi Diary (गोपीची डायरी)
ही कहाणी गोपी नावाच्या एका कुत्र्याची आणि त्याला दत्तक घेऊन आपल्या घरी आणणार्या एका प्रेमळ कुटुंबाची. सुधा मूर्ती यांच्या खास शैलीतून उतरलेल्या कहाणीतून हा गोपी कुत्रा स्वत:शीच बोलतो. सुरुवातीला छोटंसं पिल्लू असलेला गोपी नंतर मात्र जास्त खोडकर आणि खट्याळ होतो. त्याच्या आयुष्यात आणखी दोन सोबती कुत्रेसुद्धा येतात. गोपी हा खरंतर एक चिरंतन ऊर्जेचा आणि चैतन्याचा झराच. गोपीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो, की त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का त्याला त्या दिवशी बसतो... त्याच्या आयुष्यात नवीन आकर्षणं निर्माण होतात आणि त्याला एक नवी मैत्रीणसुद्धा मिळते - आकर्षक अशी नोव्हा. ते दोघं मिळून त्यांचं स्वत:चं कुटुंब निर्माण करतात... सुधा मूर्तींच्या लेखनाचे चाहते असलेल्या आबालवृद्धांना हा गोपी खूप आनंद देऊन जाईल आणि आपल्या छोट्या पावलांनी त्यांच्या हृदयात शिरकाव करून, तिथे कायमचं स्थान मिळवून बसेल, यात शंकाच नाही.
-
Jeffrey Archer Three In One Children Stories(जेफ्र
"जागतिक कीर्तीचे लोकप्रिय लेखक जेफ्री आर्चर हे आपल्या छोट्या वाचकांसाठी ही एक आगळीवेगळी रोमहर्षक कहाणी घेऊन आले आहेत. यात तीन गमतीदार गोष्टींचा समावेश आहे.. प्रिया कुरियन आणि अनुपमा अजिंक्य आपटे यांनी आपल्या मजेदार देखण्या चित्रांनी या पुस्तकाची सजावट केलेली आहे. राजा-राणीची रंगतदार गोष्ट, किलर किपरची जम्माडी जम्मत आणि अद्भुत चौकोनी जगाची ही सफर आपल्या बालवाचकांना मनमुराद आनंद देईल."
-
Chhotishi Paulvat Va Itar Goshti(छोटीशी पाऊलवाट व
‘गोष्ट डॉट कॉम किशोरांसाठी’ या पुस्तकात किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणारी मूल्ये आणि संस्कार यांच्याशी संबंधित बोधकथा ज्ञानदा नाईक यांनी लिहिल्या आहेत. आजच्या काळात किशोरवयातील मुलांना मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट, व्हिडिओ गेम्स अशा अनेक भुरळ पाडणार्या गोष्टी उपलब्ध आहेत. यांच्या पसार्यात हरवलेली मुले जगण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये आणि संस्कार हरवून बसतात. जगण्यातला आनंद गमावून बसतात. फार लहानही नाही आणि मोठेही नाही अशा अडनीड वय असणार्या या मुलांना दिशा देण्याचे काम या बोधकथा करतात. कुठलाही उपदेश नाही, तर ‘कसे जगावे’ हे या बोधकथांमधून ज्ञानदा नाईक सांगतात. प्राणी, पक्षी, फुले, पाने यांना त्यांनी आपल्या कथांमध्ये बोलते केले आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, धाडस, चातुर्य, कल्पकता, संवेदनशीलता या गुणांचे महत्त्व त्यांनी या बोधकथांमधून सांगितले आहे. आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासणे किती आवश्यक आहे, ते सांगितले आहे. तसेच आपले मित्र, संस्कृती, निसर्गाप्रती प्रेम, समाजासाठी आपली कर्तव्ये यांचे महत्त्वही या बोधकथा सांगतात. किशोरावस्थेतील मुलांमध्ये भावनिक ओलावा निर्माण करणारा हा बोधकथांचा झराच ज्ञानदा नाईकांनी आपल्यासाठी आणला आहे.
-
Khara Guru Kon Va Itar Goshti(खरा गुरु कोण व इतर ग
‘गोष्ट डॉट कॉम किशोरांसाठी’ या पुस्तकात किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणारी मूल्ये आणि संस्कार यांच्याशी संबंधित बोधकथा ज्ञानदा नाईक यांनी लिहिल्या आहेत. आजच्या काळात किशोरवयातील मुलांना मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट, व्हिडिओ गेम्स अशा अनेक भुरळ पाडणार्या गोष्टी उपलब्ध आहेत. यांच्या पसार्यात हरवलेली मुले जगण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये आणि संस्कार हरवून बसतात. जगण्यातला आनंद गमावून बसतात. फार लहानही नाही आणि मोठेही नाही अशा अडनीड वय असणार्या या मुलांना दिशा देण्याचे काम या बोधकथा करतात. कुठलाही उपदेश नाही, तर ‘कसे जगावे’ हे या बोधकथांमधून ज्ञानदा नाईक सांगतात. प्राणी, पक्षी, फुले, पाने यांना त्यांनी आपल्या कथांमध्ये बोलते केले आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, धाडस, चातुर्य, कल्पकता, संवेदनशीलता या गुणांचे महत्त्व त्यांनी या बोधकथांमधून सांगितले आहे. आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासणे किती आवश्यक आहे, ते सांगितले आहे. तसेच आपले मित्र, संस्कृती, निसर्गाप्रती प्रेम, समाजासाठी आपली कर्तव्ये यांचे महत्त्वही या बोधकथा सांगतात. किशोरावस्थेतील मुलांमध्ये भावनिक ओलावा निर्माण करणारा हा बोधकथांचा झराच ज्ञानदा नाईकांनी आपल्यासाठी आणला आहे.
-
Godfathers Of Crime(गॉडफादर्स ऑफ क्राईम)
दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन, अश्विन नाईक, अरुण गवळी इ. गुन्हेगारी जगताशी संबंधित नावं... नक्की कोणत्या प्रकारचे गुन्हे केलेत या गँगस्टर्सनी... कशी आली ही माणसं गुन्हेगारी जगतात... त्यातील काहींना परदेशात का पळून जावं लागलं.. .पोलिसांची, न्यायालयांची, प्रसारमाध्यमांची काय भूमिका आहे त्यांच्याबाबत...कसं आहे त्यांचं कौटुंबिक जीवन... गुन्हेगारी जगतातील गँगस्टर्सच्या घेतलेल्या महत्त्वपूर्ण मुलाखती, त्यांच्याशी फोनवरून झालेली बातचीत आणि अन्य स्रोतांद्वारे शीला रावळ यांनी या गँगस्टर्सची गुन्हेगारी, कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी उलगडण्याचा केलेला प्रयत्न.
-
The Mother (द मदर)
चीनमधील एका छोट्या खेड्यातील तीन मुलांची (दोन मुलगे, एक आंधळी मुलगी) आई...सासू, नवरा, मुलं यांची काळजी घेते...नवऱ्याच्या बरोबरीने शेतात राबते...समोर राहणाऱ्या चुलत जावेशी, दिराशी स्नेहाने वागते...नवरा अचानक परागंदा होतो...खोटी पत्रं लिहून घेऊन तो शहरात नोकरीसाठी गेल्याची बतावणी तिला करायला लागते...प्रपंचाचा गाडा एकटीच ओढत असते...जमीनदाराच्या मुनिमाची नजर तिच्यावर पडते...हो-ना करता ती त्याच्या अभिलाषेला बळी पडते आणि तिला दिवस राहतात...दरम्यान, स्वत:चा नवरा शहरात जळून मेल्याचं खोटं पत्र लिहून तिने स्वत:ला विधवा म्हणून जाहीर केलेलं असतं...मुनिमाने झिडकारल्यामुळे तिला गर्भपात करावा लागतो...यथावकाश तिचा थोरला मुलगा हाताशी येऊन कुटुंबाची जबाबदारी घेतो...धाकटा मुलगा शहरात जातो...थोरल्याचं लग्न होतं, सून घरात येते...तिच्या आंधळ्या मुलीचं लग्न होतं, पण ती मुलगी मरण पावते...तिच्या धाकट्या मुलाचाही शिरच्छेद केला जातो...असे दु:खाचे आघात होत असतानाच तिला नातू होतो...एका आईच्या जीवनाचं बहुपदरी भावनाट्य.
-
Zund (झुंड)
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विशाल. तालुक्याच्या गावी त्याचं घर. घरी आई वडील आणि लहान बहीण. वडील मजुरी करणारे. आई गृहिणी. बहीण अजून शिकतेय. एका बड्या असामीला गावात मध्यवर्ती भागात एक भव्य इमारत बांधायची आहे. विशालच्या वडिलांनी बांधलेलं यांचं छोटंसं घर त्याच्या आडवं येतं. त्या वादाचा तोडगा काढण्यासाठी विशाल पुण्याहून गावी येतो. येतो तो अडकतो. तालुक्यातलं राजकारण, आई वडील, इतर नातेवाईक आणि त्याची नव्याने झालेली जीवनसाथी या सगळ्यांमध्ये गुंतत जातो. एका बाजूला राजकारणाल्या कुरघोड्या, लढाया, हाणामारी, अपहरण आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाकडून मिळालेली साथ, प्रेम आणि झुंडीसोबतचे ऋणानुबंध. राजकारणी आणि व्यवसायातल्या बड्या ध्येंड्यांशी दोन हात करताना त्याच्या पाठीशी उभी राहते तरुण पोरांची झुंड. विशालच्या झुंडीची ही कथा. वाचकाला सकारात्मक भावनिक अनुभव देणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
-
Cured (क्युअर्ड)
पंधरा वर्षं `स्वयंस्फूर्त रोगमुक्ती` या संकल्पनेचा अभ्यास करणारे हार्वर्ड मेडिक - डॉ. जेफ्री रेडिगर.. हजारो रोगमुक्तीच्या कहाण्यांचा आढावा घेत ते जगभर हिंडले. स्वादुपिंडाचा अत्यंत दुर्धर कर्करोग झालेला निवृत्त क्लेअर ते ब्रेन ट्यूमर झालेला तरुण मॅट. अशा अनेक केसेसचा त्यांनी मागोवा घेतला.. या रुग्णांची बचावण्याची शक्यता नगण्य होती. त्यात त्यांनी किमो थेरपी आणि रेडिएशन घेण्यासही नकार दिला. त्यांनी मृत्यूला शांतपणे सामोरं जायचं ठरवलं; पण दरम्यान असं काय घडलं की आज सुमारे दशकभरानंतर देखील दोघंही जिवंत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या शरीरात त्या भयंकर गाठींचा मागमूसही राहिलेला नाही!!
-
Rafinu (राफिणू)
कनसाई गावात होतो कोरोनाचा प्रवेश... त्याच गावातील फिरके गुरुजींचा चुणचुणीत, हुशार, जिज्ञासू मुलगा राजू इतरांसह करतो कोरोनाग्रस्तांना आणि इतर गावकर्यांना मदत... आपल्या ड्रोनचा वापर करून तो आजारी लोकांसाठी मागवतो औषधं...शेजारच्या गावातील लाकोंना एका वनस्पतीचा रस घेतल्याने कोरोनापासून मुक्ती मिळाल्याचं समजतं त्याला... शेजारच्या गावातल्या माणसाला मदतीला घेऊन तो जातो ती वनस्पती माहीत असणार्या आदिवासींकडे...ती वनस्पती घेऊन त्याचा प्रयोग करतो कनसाई गावातल्या रुग्णांवर आणि ते होतात कोरोनामुक्त...तो आपल्या किरणमामाची आणि त्या आदिवासींची घालून देतो भेट... तेव्हा त्या दोघांनाही कळतं की ते कुणी आदिवासी नसून आहेत परग्रहवासी... परग्रहवासीयांकडून वनस्पती घेऊन डॉक्टर किरण देतात औषध निर्माण करणार्या विविध कंपन्यांना...त्यातून वेगळ्या केलेल्या रेणूला नाव दिलं जातं राफिणू (राजू फिरके रेणू)... या कामासाठी राजूचा पंतप्रधानांच्या हस्ते होतो सत्कार...
-
Dharm Ani Samlaingikta (धर्म आणि समलैंगिकता)
समलैंगिकता म्हणजे काय? आपले धर्म याबद्दल काय म्हणतात? हिंदू पौराणिक कथा, इस्लाम, जैन आणि बौद्ध धर्मातील साहित्यात याविषयी काय दृष्टीकोन दिसतो? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन देवदत्त पट्टनायक यांनी जगभरातील प्रत्येक धर्माचा समलैंगिकतेबद्दलचा काय विचार आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय, निसर्गात समलैंगिकता सहजपणानं दिसते व त्यात अनैसर्गिक काही नाही असंही ते दाखवून देतात. अनेक संस्कृतींमध्ये समलैंगिकतेबद्दलची विचारसरणी सकारात्मक नसली तरी, आधुनिक काळात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे आणि जगभरात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळते आहे.प्रसिद्ध पुराणकथातज्ज्ञ देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक या विषयावरील अनेक गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. खूप माहिती देणारं आणि वस्तुस्थितीबद्दल समृद्ध करणारं हे अप्रतिम पुस्तक आहे.
-
Ardhanaari (अर्धनारी)
एक अनोखी कथा. दोन वेगळे शेवट. पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्यातल्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंधड्या उडालेल्या पाहून वाचक मोठ्या विमनस्क स्थितीत जातात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? ट्रायल बाय सायलेन्स (मौन बचाव/अर्धनारी) ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन’च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पूर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. मंदिरोत्सवपश्चात दोघांनाही त्यांच्या आधीच्या आदर्श सहजीवनाच्या नव्या आणि कठोर अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मुरुगन यांच्या जादुई बोटांतून सहज झरणारी ही कथा एका आश्चर्यकारक आणि नाट्यपूर्ण निष्कर्षाला पोहोचते.
-
Haravlelya Goshtinche Rahasya (हरवलेल्या गोष्टीचे
"चौदा वर्षांची अनुष्का मागचे वर्षभर लॉकडाऊन मध्ये राहिलेली आहे. आता ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला सोमनहळ्ळीला तिनं पुरातन पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या ‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ च्या आठवणी अजून ताज्या आहेत. अखेर एकदा घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का खूष आहे. पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त याखेपेला ती तिच्या स्वतःच्याच घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे. या पुस्तकातून लेखिकेनं प्रश्न विचारण्याचं आणि यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात.
-
Raaz Mahal (राझ महाल)
आग्रा, भारत – ताजमहालाचं शहर. ब्यूरो ऑफ आर्किऑलॉजिकडे (बीओए) माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत एक विचित्र याचिका येते, ज्यात ताजमहाल या जागतिक वारसा स्थळाद्दलची आख्यायिका सिद्ध करणारे अधिकृत ऐतिहासिक पुरावे जाहीर करण्याची मागणी केलेली असते. ब्यूरो या याचिकेची जबाबदारी विजय कुमार या अत्यंत हुशार, पण स्वच्छंदी पुरातत्त्वशास्त्रज्ञावर सोपवते. हे आरटीआय प्रकरण दिसतं तितकं साधंसरळ नसल्याचं विजय कुमारच्या लक्षात येतं. काही गूढ मृत्यू व इंटरपोलचा सावधगिरीचा इशारा यामुळे प्रकरण आणखी चिघळते. सत्य शोधण्यासाठी विजय कुमार आंतरराष्ट्रीय शोध-दौर्यावर निघतो त्या दरम्यान तो स्वतःशिवाय कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कुणीतरी विजय कुमारला जाणीवपूर्वक अडकवलं आहे का? त्याचा जीव धोक्यात आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं, तो सत्य सर्वांसमोर आणू शकेल की... ते कायमस्वरूपी एक गुपितच राहील... राझ?
-
The Girlfriend (द गर्लफ्रेंड)
डॅनिएल हा हॉवर्ड व लॉरा या दाम्पत्याचा डॉक्टर होऊ पाहणारा लाडका मुलगा. हे कुटुंब सुखवस्तू आहे. चेरी नावाची गरीब घरातील मुलगी त्याच्या प्रेमात पडते. तो तिला त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन येतो; पण त्याच्या आईच्या, लॉराच्या लक्षात येतं की, चेरीची नजर त्यांच्या संपत्तीवर आहे. लॉरा ही गोष्ट डॅनिएलला समजावू पाहते; पण त्याला ते पटत नाही. तो आणि चेरी एकदा वीकेन्डला गेलेले असताना अपघात होतो आणि डॅनिएल कोमात जातो. त्या अपघाताला अप्रत्यक्षरीत्या चेरीच जबाबदार असते. डॅनिएल गेला, असं लॉरा तिला खोटंच सांगते. काही दिवसांनी डॅनिएल शुद्धीवर येतो, तेव्हा चेरी त्याला सोडून गेली, असं लॉरा त्याला सांगते. डॅनिएल जिवंत असल्याचं जेव्हा चेरीला समजतं, तेव्हा ती लॉरासमोर येऊन उभी ठाकते. मग दोघींमध्ये रंगतो शह-काटशहाचा सामना. मग चेरी ठरवते, लॉरालाच नाहीसं करायचं. काय घडतं पुढे? चेरी यशस्वी होते का? प्रेमकहाणीच्या आडून रंगलेलं एक जबरदस्त, थरारक संघर्षनाट्य.
-
Cell (सेल)
डॉ. जॉर्ज विल्सन एल.ए. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये तिसऱ्या वर्षाचा रेडिऑलॉजीचा निवासी डॉक्टर (रेसिडेंट) असतो. अमाल्गमेटेड कंपनीने तीन मोबाईल कंपन्यांच्या साह्याने ‘आयडॉक’ नावाचं एक अॅप विकसित केलेलं आहे आणि या कंपनीने वीस हजार रुग्णांवर घेतलेल्या बीटा चाचणीविषयी जॉर्जला समजतं. हे समजल्यानंतर जॉर्ज अस्वस्थच असतो. आयडॉककडून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे जॉर्जची अस्वस्थता वाढते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं तो ठरवतो. त्यासाठी तो पुरावे गोळा करायला सुरुवात करतो; पण आयडॉकचे निर्माते त्याच्या मार्गात आडवे येतात, त्याला विकत घेऊ पाहतात. ते पुरावे मिळविण्यासाठी तो काय काय उपद्व्याप करतो, त्याचा मित्र झीकडून त्याला कोणती माहिती मिळते, त्याची मैत्रीण पॉला खरंच त्याच्या बाजूने असते का, आयडॉकच्या निर्मात्यांच्या आर्थिक आमिषाला जॉर्ज बळी पडतो का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘सेल’ नक्कीच वाचली पाहिजे.
-
Antarnaad (अंतर्नाद)
कधी बाजीरावसारख्या बिल्डरला ‘अंतर्नादातून मिळते आत्मशक्ती...तर कधी महादेवसारख्या सद्वर्तनी व्यक्तीमुळे कळते एखाद्या गुन्हेगारालाही चांगुलपणाची किंमत...कधी एखादे आजोबा ‘धर्म’ या विषयावर बोलतात अतिरेक्यांशी...तर कधी श्रीयशसारख्या जीवनाबद्दल निराश झालेल्या इंजिनअरला युद्धामुळे हानी झालेल्या गावातून मिळते स्फूर्ती...तर कधी सदानंदसारख्या कॉम्प्युटर तज्ज्ञाला निर्णयाची चतु:सूत्री कॉम्प्युटरला फीड केल्यानंतर मिळतात आश्चर्यकारक रिझल्ट्स...तर कधी श्रीकांतसारखा एखादा प्रामाणिक अधिकारी जगदाळेसारख्या कामचुकार, राजकारणी सुपरवायझरवर उलटवतो त्याचा डाव...तर अनेक माणसं, त्यांच्या अनेक समस्या...माणसाच्या मानसिकतेतून उद्भवलेल्या...माणसाने जर मू्ल्यं अंगी बाणवली, सद्विचारांची कास धरली, संयम राखला तर तो निश्चितच त्या समस्येवर मात करू शकतो, असाच काहीसा संदेश देणार्या कथांचा हा संग्रह आहे...सकारात्मकतेचं महत्त्व अधोरेखित करणारा
-
Asa Lutla Bharat (असा लुटला भारत)
’वास्को द गामा’ने समुद्रमार्गे हिंदुस्थानात येण्याचा मार्ग शोधला व तीन शतके हिंदुस्थानात युरोपियन व्यापार्यांचा हैदोस चालला. हिंदुस्थानातील संपत्ती, मुबलकता व भौगोलिक-नैसर्गिक संपत्ती पाहून हिंदुस्थानला जणू विषारी विळखाच बसला. या लोभी देशांनी राजकीय कटकारस्थाने केली, करारनामे व त्यांचे योग्य पालन न करता विश्वासघात केला. जुलूम केला. फसवणूक केली. चुकीची व्यापारधोरणे, नवाबांनी कंपनीला दिलेल्या प्रचंड रकमा, बंगालचा र्हास, दुष्काळी परिस्थिती, मृत्यूचे वाढते थैमान याने देश ठाासला. मुघल सत्तेला वाईन भेट देऊन, मसाल्याच्या पदार्थांवर आक्रमण करून येथील बाजारपेठा ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनी काबीज केल्या. आपल्या पराक्रमी योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून शह दिला व युद्धे जिंकली; पण मुस्लीम नवाब कंपनीच्या हातातलं बाहुलं बनले. घनघोर युद्धे लावून युरोपियनांनी व त्यांच्या कंपन्यांनी भारतास लुटले. स्वत:च्या तिजोर्या भरल्या. मन विषण्ण करणार्या, मानवतेला हरताळ फासणार्या वास्तवाचे भीषण दर्शन.