-
Sonyachya Sangatit (सोन्याच्या संगतीत)
घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं – सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं – छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं –
-
Raoparv (रावपर्व)
सरकारला बहुमत नसताना, काँग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा नसताना, पक्षात स्वतःचा गट नसताना आणि पक्षातील अनेक गट विरोधात असताना, गांधी घराण्याशी विसंवाद असताना, डाव्यांचा कडवा विरोध असताना, देशात धार्मिक व जातीय तणाव तीव्र झाले असताना अवघड आर्थिक स्थित्यंतर शांतपणे घडवून आणले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! देशाची अर्थशक्ती जागवून त्यांनी उद्योगक्षेत्र अन् बाजारपेठेची पक्की बांधणी केली. नव्या उद्योगधोरणाव्दारे अनेक क्षेत्रे त्यांनी खाजगी उद्योगांसाठी खुली केली. अवघ्या तीन वर्षांत एक्कावन्न हजार कोटींचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले ते नरसिंह राव यांनी कल्पकतेने राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ! आर्थिक स्थित्यंतराच्या या अवघड काळाचा आणि त्या काळाला शांतपणे आकार देणाऱ्या शिल्पकाराचा वेधक धांडोळा.. रावपर्व
-
Amhi Fauji (आम्ही फौजी)
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे जुळणारे बंध. मध्यमवर्गीय नागरी कुटुंबात, सुरक्षित कोशमय वातावरणात, स्वच्छंदी फुलपाखरी जीवन जगणारी मुलगी विवाहानंतर एका सेनाधिकाऱ्याची पत्नी झाली आणि अचानक एका आयुष्यपालटाला सामोरी गेली. आपल्या या ‘फौजी’ आयुष्याची तिने टिपलेली क्षणचित्रे. आम्ही फौजी
-
George Orwell (जॉर्ज ऑर्वेल)
जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी – जॉर्ज ऑर्वेल
-
Mi Sandarbha Pokhartoy (मी संदर्भ पोखरतोय)
मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज…
-
Brahmos (ब्राह्मोस)
ब्राह्मोस! आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प म्हणजे ‘ब्राह्मोस’! अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे ‘आपण हे करू शकतो’ असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव! मर्यादित गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णयप्रक्रिया, अनोखी कार्यपद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता यांच्या संयोगातून वास्तवात उतरलेले हे स्वप्न. या प्रकल्पातून जन्मलेले यशस्वी प्रारूप आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल. या प्रकल्पाची त्याच्या निर्माणकर्त्याने सांगितलेली जन्मकथा: वेधक तितकीच प्रेरकही!
-
Coronachya Krushnachhaye (करोनाच्या कृष्णछायेत)
कोरोनाचा विषाणू बघता बघताएका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला.सगळ्या जगावर हे सावट पसरलं.कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती.बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं.हा विषाणू कुठून आला, कसा पसरला,जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत,भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे –अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारंआणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं,औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानंयाचाही लेखा-जोखा मांडणारं पुस्तक!भविष्यात अशा किती लढायांना माणसाला सामोरं जावं लागू शकेल,कुणास ठाऊक? त्यामुळे या विषयाची सामान्य माणसालासोप्या भाषेत ओळख करून देणं हीच आजची सर्वात मोठी गरज!औषधनिर्मितीच्या क्षेत्रांत जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्याअभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेलीधोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणीकोरोनाच्या कृष्णछायेत….
-
Inshaallah (इन्शाअल्लाह)
दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन.एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली.वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली.जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता.कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का?त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह.
-
Nipun Shodh (निपुण शोध)
‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वा’लाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये – डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम’ त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर’! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटर’चे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!
-
Raktagulab (रक्तगुलाब)
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी – ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी – संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं… पुढे काय घडतं?