-
Meera Aani Mahatma (मीरा आणि महात्मा)
मॅडलिन स्लेड. ती होती एका ब्रिटिश अॅडमिरलची मुलगी. रोमा रोलाँ या फ्रेंच साहित्यिकाची मानसकन्या. तिनं वाचलं एक चरित्र, रोमा रोलाँनी लिहिलेलं. महात्मा गांधींचं ते चरित्र वाचून ती भारावून गेली. इतकी की, तिनं उभं आयुष्यच गांधीजींच्या चरणी वाहायचा निर्णय घेतला. महात्माजींनी तिच्या समर्पणभावनेला प्रतिसाद दिला. तिला आश्रमवासिनी व्हायला संमती दिली. तिचं नाव बदललं, ’मीरा’ ठेवलं. त्या दोघांमध्ये विकसित झाले हळवे भावबंध. ते कधी वादळी ठरले, तर कधी हुरहूर लावणारे. त्या जगावेगळ्या नातेसंबंधांची आगळ्या शैलीत सांगितलेली प्रभावी भावकथा.
-
Kahani Londonchya Aajibainchi
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
-
Mahanayak (महानायक )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
-
नाझी भस्मासुराचा उदयास्त
जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरे होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढवा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा. तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या तिसर्या राईशच्या उदयास्ताची कहाणी.
-
Openhaimar (ओपेनहायमर)
तो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला...मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले...जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना,लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता...अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा.
-
Pangira
पांढरी या गावाच्या बदलत्या मातीची कर्मकथा म्हणजे ’पांगिरा’. माणसांचं सामुदायिक आयुष्य आणि त्यातला चढउतार हीच या कादंबरीतली प्रधान पात्रं. ’गाव’च त्याचा नायक! लोकशाहीच्या प्रयोगासाठी संस्थानं खालसा झाली. कूळकायदा आला. वतनं गेली. दलालांच्या कुर्हाडी जंगलांच्या मानगुटींवर बसल्या. भूगर्भातलं पाणी संपलं. पिकं नाहीशी झाली. दुष्काळानं गावंच्या गावं गिळली. आणि लोकशाहीतून नवी घराणी जन्माला आली. कायदे आले. परंतु कायद्यातल्या फटी नेमक्या शोधून हव्या तशा वाटा वळवण्याचं नवं शासनही व्यवहाररूढ झालं. या कादंबरीचं वैशिष्ट्य आहेगावशिवेच्या सत्तास्पर्धेचं, पर्यावरणाच्या परवडीचं, सामान्य कष्टकर्याच्या हलाखीचं चित्र. दिवसेंदिवस अधिकच भयाण, भेसूर बनत चाललेलं.
-
Aai,Tujyach Thayee (आई,तुझ्याच ठाई)
आई... भाषेतला सर्वांत जास्त वापरला जाणारा शब्द. जीवनातलं सर्वांत जास्त गौरवलं जाणारं नातं. आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्वराचा अंश. काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं. तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं..
-
Aani Mee (.... आणि मी)
एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारा आणि दुसरीकडे त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारा लेखसंग्रह.
-
Nave Sur An Nave Tarane
नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार,जोडीला नवं तंत्र अन् नवे मंत्र - या साऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत पार बदलून टाकला चित्रपटसंगीताचा चेहरा. आपल्या आसपास रुंजी घालणाऱ्या या नव्या तरुण गाण्याविषयी एका सर्जक रसिकानं मारलेल्या मनमोकळया गप्पा म्हणजे हे पुस्तक. नवं बदलतं संगीत ज्यांना ना समजतं, ना रुचतं; त्यांना ते समजून घ्यायला हे पुस्तक मदत करील. ज्यांना एव्हाना हे संगीत पचलं आहे,त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील.