-
The Alchemist
'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खापासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. नितीन कोताप्पले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुननांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी.
-
Kosla
पद्मश्री सन्मान प्राप्त, प्रा. भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यविश्वातील मोठं विलक्षण असं व्यक्तिमत्त्व आहे. १९६०च्या दशकात त्यांची ' कोसला ' ही कादंबरी आली आणि एकच खळबळ उडाली. साऱ्या प्रस्थापित जाणीवा आणि व्यवस्था यांना छेद देणारी ही कादंबरी होती; पण तेवढ्यापुरतेच या कादंबरीचं महत्त्व नव्हतं. " कोसला " प्रकाशित होऊन आज अर्धशतक उलटले, तरीही तितक्याच उत्साहाने, उत्कटतेने त्या कादंबरीवर लिहिले / बोलले / चर्चिले जाते यातच तिचे आगळेवेगळेपण ठासून दिसते. विशीतील ज्या वाचकांनी त्या कादंबरीची पहिली आवृत्ती वाचली होती ती पिढी आता सत्तरीत आली आहे, पण " कोसला " म्हातारी व्हायला तयार नाही. या कादंबरीवर बराच काळ चर्चा होत राहिली आणि नेमाडे हे नाव गाजत राहिलं. त्यानंतर “ कोसला ” इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, आसामी, पंजाबी, बेंगाली, उर्दू, ओरिया, अशा विविध भाषांमध्येही अनुवादित झाली.
-
Baalkand
आघाडीचे कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी, सॉफ्टवेअर, मार्केट अशा त्यांच्या कादंबऱ्या जाणकार वाचकांच्या कौतुकाचा विषय झाल्या. अनेक कथांना मराठी वाचकांनी मनःपूर्वक दाद दिली. अनेक नियतकालिकांचे यशस्वी आणि कुशल संपादक म्हणूनही ते मराठी वाचकांना उत्तम प्रकारे ज्ञात आहेत. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘घरदार’ ही मासिके, लोकप्रभा साप्ताहिक आणि नवशक्ती दैनिक ही त्यांनी संपादित केलेली नियतकालिके. ‘एक माणूस-एक दिवस’ या अभिनव व्यक्तिचित्रणात्मक लेखनप्रकाराचे आद्य जनकत्व त्यांच्याकडेच जाते. ‘बालकाण्ड’ ही आहे या लेखक, संपादकाच्या बालपणाची मन हेलावून सोडणारी कहाणी.
-
Eka Raanvedyachi Shodhyatra (एका रानवेडयाची शोधयात
कृष्मेघ कुंटे यांच्यासारखेच एखादे वेड आपल्यालाही लागावे, असे तीव्रतेने वाटावे, असे त्यांचे हे पुस्तक आहे. या रानवेड्याच्या शोधयात्रेतूनच एक संशोधकाचा जन्म झाला आहे.मदुमलाईच्या जंगलातील हा विलक्षण अन[...]
-