-
Razor Sharp (रेझर शार्प)
एक अमानुष सीरियल किलर मुंबईच्या रस्त्यांवरून मोकाट हिंडत आहे… त्याने आपल्या बळींची अत्यंत निर्घृण तऱ्हेने हत्या केलेली आहे. नायलॉनच्या दोरीने हात बांधून मृताच्या तोंडात धान्य कोंबणार्या या सीरियल किलरमुळे संपूर्ण शहर भीतीच्या छायेत जगत आहे.. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच प्रश्नाने पछाडलं आहे : एकामेकांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या या सर्व मृतांना जोडणारा दुवा नेमका कोणता आहे? एका चित्तथरारक मालिकेतील पहिल्या ‘रेझर शार्प’ या कादंबरीच्या पानांमधून आश्विन सांघी यांनी पुन्हा एकदा अत्यंत गुंतागुंतीचं, मती गुंग करणारं थरारनाट्य गुंफण्याचं आपलं अप्रतीम कौशल्य उलगडून दाखवलं आहे. ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर वाचकांना ती संपवल्याशिवाय खाली ठेवणं शक्यच होणार नाही.
-
Parvati (पार्वती)
पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी ! पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.
-
Shrimant Aanandibai Peshave (श्रीमंत आनंदीबाई पेशवे)
ध चा मा केला नसतांनाही...बदनाम झालेली...पेशवाईतील वादळज्योत... श्रीमंत आनंदीबाई पेशवे यांच्या जीवनावरील एक ऐतिहासिक कादंबरी
-
Swatachya Aatmyachya Shodhat Mahatma Gandhi (स्वतःच्या आत्म्याच्या शोधात महात्मा गांधी)
गांधीजींची पत्नी कस्तुरबा यांचं आयुष्य कसं गेलं. गांधीजी कडून त्यांना कशी वागणूक मिळत होती ...याचा शोध या पुस्तकात लेखकाने घेतल्याचे दिसून येते
-
Dapur te Delhi (दापूर ते दिल्ली)
एकनाथ आव्हाड हे सिद्धहस्त बालसाहित्यकार असून साहित्यातील अतिशय प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार - २०२३ त्यांना मिळाला आहे. त्यांची पुस्तके मुलांबरोबरच शिक्षक आणि पालकांसाठी अतिशय मनोरंजक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक आहेत. आव्हाड यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील दापूर हे असून त्यांच्या बालपणात डोकावून पाहिले तर एक होतकरू, परिस्थितीवर मात करणारा मुलगा, खाऊच्या पैशात किंवा भाजी विकून मिळालेल्या पैशात पुस्तके विकत घेऊन वाचणारा, गुरुजनांचा लाडका विद्यार्थी ते पुढे मुलांचे आवडते बालसाहित्यकार, कथाकथनकार अशा अनेक रूपांनी आव्हाड वाचकांना भावणारे आहेत. त्यांच्या बालसाहित्यावर दिल्ली दरबारी साहित्य अकादमीची मोहर उमटली, ही आम्हा वाचकांसाठीसुद्धा आनंदाची गोष्ट ठरली. एकंदरीतच दापूर ते दिल्ली असा उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या आव्हाड यांच्या लेखनाचा आवाका जाणून घेण्यासाठी, त्यांच्या पुस्तकांची अधिक माहिती होण्यासाठी तसेच त्यांचा साहित्यप्रवास आपल्या सर्वांसमोर एकत्रितपणे मांडण्यासाठी केलेला अभ्यासपूर्ण प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय.
-
Skalpel Te Skopee Te Robo (स्काल्पेल ते स्कोपी ते रोबो)
ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्त्र कार्याची . असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, ‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
-
Chal Bas Ek Round Marun Yeu (चल बस एक राऊंड मारून येऊ)
माझ्या 'चल बस, एक राऊंड मारून येऊ!' या कथासंग्रहाचं १७ मार्च २०१९ ला प्रकाशन झालं आणि महिनाभराच्या कालावधीतच पाचशे पुस्तकांची पहिली आवृत्ती दणक्यात संपली. फोटोग्राफी व्यवसायानिमित्त होणाऱ्या भटकंतीतून टिपलेले अनुभव कथेच्या स्वरूपात वाचकांसमोर ठेवण्याचा मी केलेला हा प्रयत्न सर्वांच्या पसंतीस उतरला, याचं समाधान निश्चितच आहे. संवेदना प्रकाशनामार्फत पुस्तकांचं वितरण होतच राहिल, नव्या आवृत्याही निघतील, मात्र पुस्तकाची मागणी वाढल्यानंतर पुस्तक लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रकाशकाच्या सोबतीने माझंही काम आहे, असं मी मानतो. अशा वेळेस देश-विदेशातल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'ई-बुक' या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे मी ठरवलं आणि त्यासाठी सुप्रसिध्द 'ब्रोनॅटो' या ई-प्रकाशनसंस्थेची निवड केली. ब्रोनॅटोने आजपावेतो अनेक पुस्तके या माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचवली आहेत आणि आँन-लाईन वाचनाचा आनंद तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या वाचकांना मिळवून दिला आहे. वाचक आणि लेखक यांच्यातलं अंतर अशा नव्या पध्दतीने कमी होणं आजच्या नेटयुगात गरजेचंच आहे. माझं हे पहिलं पुस्तक या नव्या रूपात तुमच्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा! - सुहास मळेकर १७ एप्रिल २०१९
-
Salnara Salaam (सलणारा सलाम)
माझ्या लेखनाला प्रोत्साहन देणारे माझे आयकर विभागातील मित्र श्री. रवींद्र पारकर, राजाभाऊ नार्वेकर, यशवंत कदम आणि इतर सर्व सहकारी. माझ्या लेखनाचं कौतुक करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे. माझ्या कवयित्री मैत्रिणी संगीता अरबुने, गौरी कुलकर्णी, लेखिका रश्मी कशेळकर. माझ्या लेखन प्रवासाला साक्षी असणारे, सतत प्रोत्साहन देणारे, बोरीवलीचे भूषण असलेले स्व. डॉ. गुजराथी आणि त्यांचा परिवार. माझे लेखन प्रसिद्ध करणारे तत्कालीन संपादक, लोकसत्ता, सामना, गोमंतक, साहित्यसूची, साप्ताहिक चंद्रप्रभा इत्यादी. आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी श्रीमती. उमा दीक्षित, नेहा खरे आणि ज्योत्स्ना केतकर. माझे भाऊ श्री. चंद्रशेखर आणि महेंद्र हळदणकर. वहिनी सौ. सुरेखा आणि अनघा, भगिनी सौ. छाया आणि मृणाल तसेच माझे कौतुक करणारे माझे मेहुणे श्री. दीपक कुलकर्णी आणि श्री. उपेंद्र बागायतकर पन्नास वर्षांनी नव्याने भेटलेल्या आणि माझं मनापासून कौतुक करणाऱ्या माझ्या शाळेतील मैत्रिणी. कोकण मराठी साहित्य परिषदेचा सर्व मित्रपरिवार
-
Prarabdhachi vat (प्रारब्धाची वाट)
ईश्वराने हातात लेखणी घेऊन आयुष्यात चढ उतार लिहावेत आणि एखाद्या चित्रपटात घडत असणाऱ्या घटना प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात घडत असतील तर याचाच अनुभव प्रारब्धाची वाट ह्या कादंबरी मध्ये वाचकांना येईल.गिरीश आणि अमृता दोघेही संस्कारी आणि सुशिक्षित पण नियतीने त्यांच्या माथी घटस्फोटित असा शिक्का मारला आणि दोघेही खचून गेले.संसार आणि लग्न ह्या शब्दांवरील देखील विश्वास उडून गेलेले हे दोघे पुन्हा आयुष्याकडे छान नजरेने पाहतील का ??वेगवेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या ह्या दोघांच्या प्रारब्धाची वाट एक होईल का ??एकदा वाईट अनुभव आल्याने त्यांनी मनाशी केलेला ठाम निश्चय तसाच राहील की त्यांचे मतपरिवर्तन होईल ??दोघेही पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकून जातील की फक्त एक मित्र म्हणून आपले दुःख वाटून आपले मन एकमेकांच्या जवळ हलके करून आपापल्या वाटेने निघून जातील.?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी तुम्हाला वाचायला हवी ,वाचन करत असताना तुम्ही त्यात गुंग होऊन जाल हे नक्की. ✍️ श्री.आनंद पिंपळकर ( सुप्रसिध्द वास्तूतज्ञ ज्योतिर्विद विद्या वाचस्पती )