-
Zapoorza (Part 4) झपूर्झा (भाग ४)
आपला भारत अनेक प्रज्ञावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संशोधक, संत आणि विचारवंत यांचा देश आहे. विशेषत: महाराष्ट्र हा मराठी साहित्याने सुसंपन्न आहे. मराठीतले अनेक साहित्यिक आपणाला परिचित आहेत. अण्णाभाऊ साठे, पू. भा. भावे, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर ही आणि अशी अनेक नावं आपल्या ओठांवर सहजगत्या येतात, अगदी त्यांच्या टोपणनावासकट! पण आपल्याच देशातल्या मराठीव्यतिरिक्त साहित्यिकांची यादी तितकीशी आपल्याला तोंडपाठ नसते, म्हणजे फार परिचित नाहीत! खरंतर त्यांचंही साहित्यातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचाही साहित्यिक प्रवास जाणून घ्यावा, म्हणून हा एक प्रयत्न! झपूर्झा-४ (भारतीय) घेऊन आलंय २० उत्तम साहित्यिक आपल्याचसाठी!
-
-
Radha Bhag 2 (राधा भाग २)
राधा कादंबरीच्या पहिल्या भागात राधा आणि श्रावणीचा संवाद वाचकांनी वाचला आणि अनेक वाचकांनी अगत्याने त्यांचे उत्तमोत्तम अभिप्राय पाठवले; पण पहिल्या भागात गोष्ट संपली नव्हती... राधेने श्रावणीला सांगितलेल्या प्रेमाच्या व्याख्येत प्रेमाचे नऊ पैलू नमूद केले होते. श्रावणीने त्याबद्दल बराच विचारही केला होता; पण तिच्या आयुष्यात ती या तत्त्वज्ञानानुसार आचरण करू शकली का? असा प्रश्न अनेक वाचकांच्या मनात होता. '... आणि ते कायम सुखी आणि आनंदीच राहिले' असा कथेचा शेवट होऊ शकत नाही, असं मलाही वाटत होतं. कारण आपलं आयुष्य ही अनेक चढ-उतार, अडचणी, अनिवार्यता आणि हतबलतेने युक्त असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते. हेच उदाहरण पहा : श्रीकृष्ण आणि राधा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असलं, तरी त्यांना विरह सहन करावा लागलाच. राधेसारख्या दैवी स्त्रीच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलं, तर श्रावणीसारखी सामान्य मुलगी सदैव चिंतामुक्त आणि आनंदी कशी राहू शकेल? या दुसऱ्या आणि अंतिम भागात तिच्या जीवनातील चढ-उतार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
-
Jeevdan (जीवदान)
त्याने आपल्या आईचा खून होताना पाहिलं. आणि मग त्याने खुन्याला स्वतःच देहांताची शिक्षा दिली. कोण होता तो खुनी ?त्या खुन्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला बालसुधारगृहात का जावं लागलं ? आपल्या इवल्याशा आयुष्यात काय काय सोसावं लागलं त्याला ! भावनिक आंदोलनं आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी शोकांतिका
-
Mahasamrat Asmanbharari Khand-3 (महासम्राट अस्मानभरारी खंड-३)
श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कादंबऱ्या यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’, ‘महानायक’ आणि ‘संभाजी’ या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अमेझॉन कंपनीने तर ‘झाडाझडती’ (A DIRGE FOR THE DAMMED) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे. त्यांना या आधी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत. पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिकांनी जाहीरपणे केला आहे. राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी फेस्टिव्हल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.
-
Lust For Mumbai (लस्ट फॉर मुंबई)
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
-
Tipu Sultan Gatha Mysorechya Rajkiya Antaralachi 1760-1799 (टिपू सुलतान गाथा म्हैसूरच्या राजकीय अंतराळाची १७६०-१९७७)
टिपू सुलतान भारतीय इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तिमत्यांपैकी एक. तो शूर सैनिक, पण अपयशी रणनीतीकार आणि कट्टर धार्मिक शासक होता. पण तो खरोखरच युद्धनायक होता का? की स्वातंत्र्यसैनिक होता? त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य किती परिणामकारक होते? या आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे हे टिपू सुलतानचे अधिकृत आणि सखोल चरित्र त्याच्या जीवन आणि कशाचे अनेक नवे पैलू उघड करते.
-
Kanchangangechya Kushit (कांचनगंगेच्या कुशीत)
कांचनगंगा शिखर आणि त्याच्या आसपासचा भूभाग म्हणजेच महाभारत काळातील किरात राजांचा प्रदेश. दऱ्यांमागून दऱ्या, घनदाट जंगलं, असंख्य प्राणी-पक्षी, मुळात हा सर्व परिसरच अस्पर्श अशा निसर्गसौंदर्यानं भरलेला आहे. येथील अभयारण्ये जगातील निसर्गदत्त वारसाहक्क स्थळांपैकी एक आहेत. जोसेफ हूकर सारखे वनस्पती शास्त्रज्ञ येथील निसर्ग सौंदर्याने भारून गेले होते. निसर्गाच्या जोडीला हा परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अंगाने देखील समृद्ध आहे. जगातील तिसरे सर्वोच्च शिखर म्हणून या कांचनगंगा शिखराला लौकिक प्राप्त झाला आहे. कांचनगंगा शिखर रांग खूप मोठी आहे. या शिखराला अनेक नावांनी ओळखतात- कांचनगंगा, खान्नचेनझोंगा, कांगचेनजुंगा इत्यादी. याच्या 'कांग-चेन-झोन्गा' या तिबेटी नावामध्ये आणखी एक अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे पाच ऊर्जास्रोतांचा साठा किंवा उगम. अशा या शिखराच्या पायथ्याशी केलेली मनसोक्त भटकंती म्हणजे हे पुस्तक
-
Aai Mazi Ahe (आई माझी आहे)
एक रंगेल तरुण श्रीमंतीत वाढलेला. श्रीमंती सुखं (`ती’ची) त्याच्या नसानसांत भिनलेली असतात... स्त्रीसुख ही त्याच्या दृष्टीने दोन घटकांची करमणूक असते. पावित्र्य, शील, चारित्र्य, सामाजिक आणि कौटुंबिक चौकटीतले संकेत, शिष्टाचार, नातेसंबंध या गोष्टींशी सदानंदाला काहीही देणंघेणं नसतं. सुगंधी फुलाचा वास घेऊन ते चुरगाळून टाकायचं एवढंच त्याला माहीत असतं. हवापालटासाठी थांबलेल्या हॉटेलात, एक कमनीय बांध्याची सुंदर स्त्री, आपल्या बारा वर्षांच्या मुलासह राहायला येते. हवापालटामुळे मुलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी इतकाच तिचा उद्देश असतो. पण, वेगळंच घडू लागतं... रंगेल तरुणाची वासना व स्त्रीची हतबलता का दडलेली आशा? एक स्त्री – एक पुरुष मित्र नसू शकतात या वाक्याला पुरक असं हळूहळू घडत जातं का कोणी घडवत जातं? जे घडतं ते स्वप्न का सत्य? आई - मुलगा आणि तो यांच्यात नेमकं कसं नातं तयार होतं? या विचारांना पलटणार्या पानागणिक उत्तरं मिळत जातात आणि ‘आई माझी आहे’ हे सिद्ध होतं.
-
Day Care (डे केअर)
या कथासंग्रहात एकूण सतरा कथा आहेत. ‘...आणि तुम्ही म्हणता’, ‘डे-केअर’, ‘रामायण- रामायण’ या कथा वेगवेगळ्या अंगाने वृद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. तर ‘क्षण’ या कथेतून प्रकटते माणसाची किळसवाणी लालसा... ‘गाऱ्हाणं’ कथेतील मालकीण आपल्या मोलकरणीसाठी देवीकडे मागते सन्मान. ‘कॉरिडॉर’मधून व्यक्त होते कोमातून बाहेर आलेल्या अरू या नर्सची व्यथा. ‘जजसाहेब’ या कथेतून व्यक्त होतं पत्नीपीडित पुरुषाचं मनोगत. ‘तर्री’ आणि ‘सहज’ दोन कथा फेसबुक मैत्रीवर भाष्य करणाऱ्या आहेत. एका विशिष्ट विषयावर केलेलं भावरूपी, व्यामिश्र चिंतन, अशा सूत्रातून या कथा साकारल्या आहेत.
-
Yugandhar Shreekrushna Ek Chintan (युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन)
श्रीकृष्ण ही लोकोत्तर व्यक्तिरेखा; पण केवळ चमत्काराच्या चष्म्यातून त्याच्याकडे न बघता, त्याचं लोकोत्तरत्व जाणून घेणं कसं महत्त्वाचं आहे, ते या पुस्तकरूपी चिंतनातून शिवाजी सावंत यांनी अधोरेखित केलं आहे. ‘युगंधर’ ही कादंबरी लिहिण्याआधी त्या कादंबरीतून श्रीकृष्णाचं व्यक्तित्व ते कसं उलगडणार आहेत, याची ही रूपरेषा आहे. खरंच, मराठी साहित्यात आज श्रीकृष्ण आवश्यक आहे काय?, श्रीकृष्णाचं मराठी लोकजीवनाशी असलेलं अतूट, तिपेडी भावनातं, वैज्ञानिक युगाच्या पसार्यात धर्माचं स्थान कोणतं? श्रीकृष्ण धर्मसंस्थापक होता काय? खरंच, बालकृष्ण कसा असेल? ‘युगंधर’ शीर्षकाची पार्श्वभूमी, तसं ‘युगंधरा’चं सार्थ चित्र एक तरी चितारलं गेलंय का?, ‘कृष्णा’चा युगंधर कसा झाला?, कंस ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा कशी?, श्रीकृष्णाचं वास्तव बालपण कसं असेल?, गीतोपदेशासाठी अर्जुनाचीच निवड का?, राधा-मीरेपासूनचे श्रीकृष्णभक्त इ. मुद्द्यांच्या आधारे त्यांनी श्रीकृष्णाचा आणि त्याच्या युगंधरत्वाचा वेध घेतला आहे.
-
Krantikaal (क्रांतीकाल)
`स्वातंत्र्यप्राप्तीसाठी १८५७साली भारतात पहिला देशव्यापी उठाव झाला. तेव्हापासून क्रांतिकाल प्रारंभित झाला असं मानायला प्रत्यवाय नाही. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा क्रांतिकाल संपला नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या क्रांतिसंस्थेचा पुण्यात मोठ्या थाटामाटात सांगता समोर झाला.’ याच इतिहासास साक्षी ठेवून केवळ भारतीय क्रांतीविषयीच नव्हे, तर जगातील अन्य क्रांतिकार्यांचीही दखल यात घेतलेली आहे. `ते सारे लेख क्रांतीचं मूळ सूत्र धरून, प्रस्तुत पुस्तकात एकत्र गुंफले आहेत. अर्थात देशाप्रमाणे व काळाप्रमाणे क्रांतीचं स्वरूप भिन्न होतं जातं; परंतु `क्रांती’ या शब्दाचाच अर्थ ‘आमूलाग्र बदल’ असा घेतला, तर या सर्व देशांतून क्रांतीचं ते सूत्र समान होतं. हा कोणत्याही एका राष्ट्राच्या क्रांतीचा समग्र इतिहास नव्हे!’ भा. द. खेरांच्या या लेखणीचा अनुभव हे पुस्तक वाचल्यावरच येतो.