-
Swaminathan Bhukmukticha Dhyas (भूकमुक्तीचा ध्यास)
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) - हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.
-
Shalana Lihileli Patre (शाळांना लिहिलेली पत्रे)
जे कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना पाठविलेल्या पत्रांचे हे संकलन आहे. 'कृष्णमूर्ती ह्या पत्रांमधून - निव्वळ पदवीलाच महत्त्व न देता विद्यार्थ्यांचा परिपू्र्ण विकास साधून त्यांना मानवी जीवनाची मौलिकता आणि प्रतिष्ठा ह्या गोष्टींची जाणीव करुन देणे, केवळ ऐहिक प्रगतीवरतच लक्ष केंद्रित न करता त्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टीचा वेध घेण्यासाठी आणि वैश्विक समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना तयार करणे ह्या बाबतीत शिक्षणपद्धतीला आलेल्या अपयशाकडे आपले लक्ष वेधतात. ही पत्रे वाचताना पालक, शिक्षक, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षणाविषयी आस्था वाटणा-या अन्य व्यक्तींच्याही जाणिवा समृद्ध होतील.
-
Rujwai (रुजवाई)
नकळत्या वयात संजूला हेतुतः दुर्लक्षित करणाऱ्या मानसीची योगायोगाने त्याच्याशी भेट होते आणि जुन्या ‘ऋणानुबंधा’ची जाणीव ठेवत त्याने केलेली पाठराखण तिला स्पर्शून जाते. मुकुंदाची आई ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मुलाला मोठे करते; पण सून आल्यावर या आईवर बेघर होण्याची वेळ येते; मात्र तिचा कसा कायापालट होतो, ते सांगते ‘कायापालट’ ही कथा. ‘नातिचरामि’ कथेतील माधवीने एका कलंदर कलाकाराच्या प्रेमात पडून पस्तीस वर्षे त्याला मनापासून साथ दिली. आयुष्याच्या उतरणीवर त्यानेही खुल्या मनाने त्याचे श्रेय तिला दिले, पण एक अबोध अदृश्य सल तिला सतत खुपत होता... मानवी भावना व नातेसंबंधाच्या मनोहारी अनुबंधाचं मनोज्ञ दर्शन घडविणाऱ्या कथांचा संग्रह ‘रुजवाई’...
-
Madam Butterfly (मदाम बटरफ्लाय)
ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घटी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..
-
Hows That (हाऊज दॅट)
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.
-
Ruk Jaana Nahi (रुक जाना नाही)
ही जीवन गाथा आहे भावेश भाटिया यांची. राष्ट्रपती पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आलेले भावेश भाटिया म्हणजे ‘सनराईज कॅन्डल्स’ या उद्योगाचे संस्थापक. पूर्णत: दृष्टिहीन असूनही त्यांनी निश्चय व मेहनतीच्या बळावर महाबळेश्वरमध्ये एका हातगाडीवर मेणबत्त्यांचा व्यवसाय सुरू केला. आज कोटींत उलाढाल असलेला हा उद्योग हजारो दृष्टिबाधित बंधूभगिनींच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो आहे. नेत्रदिपक व्यावसायिक भरभराटीसोबतच भाटिया यांनी क्रीडा क्षेत्रातही अतुलनीय योगदान देत ‘राष्ट्रीय पॅरालिम्पिक’ व ‘इंडियन ब्लाइन्ड स्पोर्ट्स असोसिएशन’ची एकूण ११४ पदके जिंकली आहेत.
-
Karnalok (कर्णलोक)
‘अनाथ' शब्दाची चीड असलेला बारा-चौदा वर्षांचा एक मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला' नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या' सुखदुःखांशी बांधला जातो... त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं.... तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी...म्हणजेच ‘कर्णलोक.
-
Cocktail Carnival (कॉकटेल कार्निव्हल)
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणाऱ्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
-
Nabhantmani (नभांतमणी)
ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी स्वीकारतो... यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका त्याच्या प्रेमात पडते... धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायऱ्या चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो....धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’
-
No Not Never (नो नॉट नेव्हर)
ही कहाणी आहे वऱ्हाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात. स्वैर, उच्छृंखल मंकी आपल्या अनिर्बंध जगण्यासाठी वेळोवेळी राणीला वेठीस धरते. आणि राणीचं पुण्यातलं जगणं आव्हानांनी भरून जातं. तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी
-
Jalianwala Baug (जालियनवाला बाग)
१३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका क्रांतिवीराची धगधगती कहाणी..सत्यकथेवर आधारित कथाबीज असलेली विलक्षण कादंबरी
-
Atmavanchana (आत्मवंचना)
सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
-
Lady Jallad (लेडी जल्लाद)
जल्लाद...हा शब्दही अंगावर शहारे आणणारा. स्त्रियांच्या नाजूक स्वभावाकडे पाहता हे काम कुणी स्त्री करू शकेल, याबाबत क्वचितच कुणाला विश्वास बसेल. पण बावीस वर्षीय चेतना मुल्लीक वर जल्लाद या वडिलोपार्जित कामाची जबाबदारी येते. आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं नवं वळण घेतं. सामाजिक गृहितकांना धक्का देत वेगळ्या वाटा धुंटाळणारी ही चेतनाची कहाणी अनेक अर्थ्यांनी वाचकांसाठी उत्कंठावर्धक आहे
-
Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha (सांस्कृ
दक्षिण आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरिया या देशांतील निवडक लोककथा या पुस्तकात आहेत. या सर्व देशांत भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपासून प्रसार झालेला आहे. या प्रदेशाला 'बृहत् भारत' असेही म्हणतात किंवा आजच्या भाषेत आपण त्याला 'विस्तारित भारत' असेही म्हणू शकतो. सर्व दक्षिण आशियातील देशांत भारतीय संस्कृती व भारतीय जीवनमूल्यांचा फार खोलवरचा प्रभाव आहे. या सर्व देशांची लोकसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इथे लोककथांचे प्रचंड भांडार उपलब्ध आहे. या पुस्तकात प्रत्येक देशाच्या दहा कथा निवडताना ज्या कथांतून भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडेल अशा कथा निवडल्या आहेत. या कथांतून भावासाठी बलिदान देणारी बहीण, आईची रक्षा करणारा वाघ, एकनिष्ठ पत्नी, एकनिष्ठ पती, कर्तव्यदक्ष राजा, गुंतागुंतीच्या प्रकरणात न्याय करणारा न्यायाधीश, मधाच्या एका थेंबासाठी राज्य कसे गेले, अशा अनेक विषयांवरच्या कथा वाचायला मिळतात. यातील प्रत्येक कथा आपल्याला भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडवील आणि त्या देशांचे आपल्या देशाशी नाते आहे हे लक्षात येईल. यातील कथा या सर्व देशांना भारतीयांशी जैविकरीत्या जोडणाऱ्या आहेत. हे सर्व देश म्हणजे आपल्या संस्कृतीचा विस्तार आहेत.
-
Dr.Babasaheb Ambedkar Anubhav Aani Aathavani (डॉ.
डॉ. आंबेडकरांचे काही इतस्तत: विखुरलेले अनुभव आणि त्यांचे सहकारी व निकटवर्तीय यांच्या आठवणी येथे एकत्र केल्या आहेत. बुद्धिमान, कष्टाळू आणि संवेदनशील अशा डॉ. आंबेडकरांच्या वाटेत पूर्वग्रहांची अभेद्य व चिरेबंद भिंत कशी आडवी आली होती आणि तिने त्यांचे जीवनकार्यच कसे संकटात आणले होते हे वाचकाला येथे दिसेल. समजूतदार आस्थेवाईकपणे टिपलेल्या त्यांच्या सशक्त व चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या खुणा त्याला येथे आढळतील. त्यांचे धवल चरित्र आणि उज्ज्वल यश पाहून प्रशंसेची दाद त्याला द्यावीशी वाटेल. ते त्यांच्या काळातील स लक्षणीय व होते. त्यांचे अल्पज्ञात पैलू, चारित्र्य आणि तत्कालीन गुंतागुंतीच्यी परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकल्यामुळे हा एक अमूल्य ग्रंथ झाला आहे. पुढेही तो तसाच राहील.