-
Drashta (द्रष्टा)
द्रष्टा - वीणा गवाणकर दिसणाऱ्या गोष्टी बघायला शिकवणारा... विवेकाची साथ कधीही न सोडणारा... साधेपणाचा निस्सीम पुरस्कर्ता... मानवतेच्या एकात्मतेचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उद्गाता... मृत्यूलाही सजग मनानं अनुभवणारा... निसर्गपूजक हेन्री डेव्हिड थोरो
-
Haravlelya Karnaphulanche Rahasya (हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य)
"अनुष्काच्या हातात प्राचीन कानातल्यांची एक जोडी लागते आणि अज्जा-अज्जीसोबतचा तिचा शांत सुट्टीचा काळ आयुष्यातील सर्वात मोठ्या साहसात बदलतो. उज्जैनच्या पवित्र घाटांपासून अमृतसरच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत, दिल्लीच्या ऐतिहासिक गल्लीबोळांतून ते थेट लंडनपर्यंत, अनुष्का रहस्य आणि इतिहासाने उजळलेल्या धाग्याचा पाठपुरावा करते. प्रत्येक टप्प्यावर तिला प्रेम आणि विरहाच्या विस्मृतीत गेलेल्या कथा भेटतात आणि खरे खजिने फक्त सुंदर नसतात, तर जपून ठेवण्यासारख्या आठवणीही सांभाळतात, हे तिला उमजते. भारतातील लाडक्या कथाकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सांगितलेली द मॅजिक ऑफ द लॉस्ट इअरिंग्स ही एकात्मतेची, धैर्याची आणि वारशाची हृदयस्पर्शी कथा आहे, जी शेवटचे पान वाचूनही मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते."
-
Chhoti Aai (छोटी आई)
अनाथाश्रमातून प्रमिलाताई लग्न करून आप्पांच्या घरी येतात. प्रताप व गौरीची आई आजारपणात अर्ध्यावर संसार सोडून जाते, याचे दु:ख सर्व घरावर पसरलेले असते. आपल्या प्रेमळ, संस्कारी, कर्तव्यदक्ष वागण्याने प्रमिलाताई सर्वांना आपलसं करतात;पण प्रतापच्या मनात अढी असल्याने त्यांचं मन उदास असे. पण तरीही चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांनी प्रतापची कधीच गय केलेली नसते. कायम त्या मुलांच्या भविष्याचा, आजींचा, आप्पांचा विचार करतात. स्वार्थी, घरफोड्यावृत्तीच्या मामांपासून प्रमिलाताई आपल्या घराला वाचवतात. पण शेवटी मामा आजींचे दागिने लाटाळतातच. आजींना हा कावा फार उशिरा कळतो. त्या यात्रेला निघून जाणार असतात; पण प्रमिलाताई त्यांना नमस्कार करून प्रताप आजारी असल्याचं सांगतात व प्रतापकडे दवाखान्यात आणतात. प्रताप ‘छोटी आई’ची चातकासारखी वाट पाहतो. आपल्या प्रेमळ ‘छोटी आई’ ला त्याने ओळखलेलं असतं. सावत्र आई इतका जीव लावणारी असते, हे प्रतापला कळून चुकते. आप्पांनाही व्यवसायात छोटी आई मदत करते. गौरी तर ‘छोटी आई’ची लाडकीच असते. स्वत:ला मूल होऊ न देता ही ‘छोटी आई’ आप्पांचा विस्कटलेला संसार सावरते.
-
Kalokhache Themb (काळोखाचे थेंब)
एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायतेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहायतेवर, तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा आविष्कार शब्दबद्ध करणं.
-
Pisantola (पिसांतोला)
"रोबोटमधला माणूस, मृत्यूनंतरही जिवंत राहणं, पाण्यात राहणारी माणसं, कधी गायब होणं तर कधी चौथ्या मितीत अडकणं, कधी इतिहासातला माणूस आजचा वर्तमान तयार करताना बघणं तर कधी ल्युसिड ड्रीमने स्वप्नं तयार करून त्यावर सत्ता गाजवणं अशा विविध विज्ञान संकल्पनांनी भविष्यात घेऊन जाणाऱ्या कथा. माणसाच्या कल्पना, त्याची स्वप्नं आणि सत्य विज्ञान यांची सांगड घालून जीवनाच्या आणि मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना दाखवणाऱ्या अतिशय मनोरंजक अशा विज्ञान आणि स्पेक्युलेटीव्ह कथांचा हा संग्रह पाचव्या मितीचं दर्शन घडवतो. खऱ्या जीवनाचा अर्थ, काही स्वप्नं सत्यात उतरल्यावरचं त्याचं रूप विज्ञान लख्ख दाखवू शकतं. त्याचा अर्थ, विज्ञान माणसाला मर्यादा समजावून सांगतं. "
-
Lullaby Town (ललबाय टाऊन )
"पीटर अॅलन नेल्सन हा अतिशय यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आहे, ज्याला हवे ते मिळवण्याची सवय आहे. आणि आता त्याला हवे आहे, यशाच्या मागे धावताना ज्यांना त्याने सोडून दिले, त्या पत्नीला आणि लहान बाळाला शोधून काढणे. हा प्रकार कोल सहज हाताळू शकला असता; पण जेव्हा तो नेल्सनची माजी पत्नी शोधून काढतो, तेव्हा प्रकरण भयानक वळण घेते. या भीषण गुंत्यात कोलचा सामना न्यूयॉर्कमधील निर्दयी माफिया कुटुंबाशी आणि गॉडफादरच्या विकृत, सायको खुनी मुलाशी होतो. आणि अनपेक्षित स्वभावाचा नेल्सन जेव्हा स्वतःच या सगळ्यात उडी घेतो, तेव्हा आधीच तणावग्रस्त परिस्थितीचा स्फोट होतो."
-
Atarkya (अतर्क्य)
कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘अतर्क्य’ हा वास्तव आणि कल्पना यांत गुंफलेला, अंगावर शहारे आणणारा कथासंग्रह आहे. यामध्ये सत्य, कल्पित आणि या दोन्हींचे मिश्रण असलेल्या अशा विविध कथा आहेत. मानवी मनाच्या सर्वसामान्य जाणिवा आणि तर्काच्या पलीकडल्या काही घटना यांचा अनुभवही अशाच खास; परंतु विशिष्ट जाणिवांच्याच मनुष्य प्राण्याला येत असेल किंवा आला असेल; एकदा – अनेकदा – अचानक आणि त्याचीच गुंफण या कथासंग्रहात झाली आहे. एकूण सहा कथांचा हा कथासंग्रह काहीअंशी वास्तवतेतील वेदनादायी परिस्थिती विशद करतो. गूढ - भय – रहस्य – भुतं – पूर्वजांवरची निष्ठा-अनिष्ठा – पिढ्यांना मिळालेला शाप – बळी प्रथा – अटळ गोष्टींमागची सत्यता – करणी केल्यामुळे उमटणारे पडसाद – अपमानाचा बदला घेण्यासाठी मृत्युपश्चातही जिवंत असलेली क्रूर वासना अशा विचित्र व अमानविय वाटणाऱ्या भावनांचा संग्रह म्हणजे ‘अतर्क्य..!’
-
Changej Khan Aani Adhunik Jagachi Nirmiti (चंगेज खान आणि आधुनिक जगाची निर्मिती)
रोमन लोकांनी चारशे वर्षांत जितकी भूमी पादाक्रांत करून जितक्या लोकांना अंकित केले त्यापेक्षा अधिक भूमी नि लोक चंगेज खान ह्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याने पंचेचाळीस वर्षांत जिंकून घेतले. जिंकलेल्या प्रत्येक देशात मंगोल लोकांनी सांस्कृतिक अभिसरण व व्यापार वाढवला. त्यातून संस्कृतीला बहर आला. आशिया आणि युरोपातील बहुसंख्य राजांच्या तुलनेत प्रागतिक असणाऱ्या चंगेज खान ह्याने जनतेची छळवणूक थांबवली, सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि सरंजामशाही रद्द करून परंपरागत विशेषाधिकारांना मूठमाती दिली. एका भटक्या जमातीपासून सांस्कृतिक कल्लोळ निर्माण करणाऱ्या मंगोल साम्राज्यापर्यंतच्या आधुनिक जगाची निर्मिती कशी झाली ह्या प्रवासाची ही गाथा! “अमंगल प्रारंभापासून इतक्या उंचीवर पोहोचणारे येशू ख्रिस्ताचा अपवाद वगळता अन्य कुणी असू शकेल, असे वाटत नाही!” – हार्पर्स “वेदरफोर्ड ह्यांच्या जिवंत विश्लेषणामुळे मंगोल संस्कृतीचा लौकिक पुनःस्थापित झालेला आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण वळसे घेत वाचकांना तपशील वैविध्याची भेट देणारे अत्यंत कसबी लेखन !” – कीर्कस रिव्ह्यूस “वेदरफोर्ड हे विलक्षण कथाकथनकार आहेत. त्यांनी रेखाटलेले चंगेज खान ह्याचे व्यक्तिमत्त्व हे सखोल परिश्रमातून आणि गुंतागुंतीच्या तपशिलांतून निर्माण झाले आहे. वेदरफोर्ड ह्यांचे लेखन म्हणजे मंगोल साम्राज्यनिर्मात्याच्या गुणावगुणांचे उदारतेने घडवलेले दर्शन !” – मिनियापोलीस स्टार ट्रिब्यून
-
Allamiyacha Karkhana (अल्लामियाचा कारखाना)
अल्लामियाचा कारखाना’ ही कादंबरी सध्याच्या काळात उर्दू भाषेत लिहिल्या जात असलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांपैकी एक आहे. या कादंबरीत एका किशोरवयीन मुलाच्या नजरेतून मुस्लीम समाजातील व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जगण्यातील समस्यांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. लेखकाच्या नजरेतून पाहताना रोजच्या वास्तवातल्या नेहमीच्या गोष्टी हैराण करणाऱ्या वास्तवात रूपांतरित होतात. याची विविध उदाहरणं विचारप्रवृत्त करणाऱ्या या कादंबरीत पानोपानी आढळतात. रोजच्या जगण्यातील ताण्याबाण्यांना कुशलतेने कलात्मक रूप देण्यात, संदिग्धतेला फाटा देऊन रोजच्या जगण्यातल्या गोष्टींमागे दडलेला अर्थ शोधण्यात मोहसीन खान यांचा हातखंडा आहे. याचा प्रत्यय या कादंबरीभर येत राहतो. एकूणच, सहज-सोप्या शैलीत मार्मिक भाष्य करणाऱ्या या कादंबरीचा विषय जितका गंभीर आहे, तितकीच या कादंबरीची लेखनशैली प्रायोगिक आहे.
-
Spymaster (स्पायमास्टर)
एका गुप्त दहशदवादी संघटनेच्या हल्ल्याशी सामना - कथानकाचा मुख्य चेहरा `स्कॉट हार्वथ` हा कार्लटन ग्रूपचा आधारस्तंभ - अमेरिकेतली ‘द कार्लटन ग्रूप` ही संघटना अमेरिकेच्या ‘सीआयए` या मुख्य सुरक्षा संघटनेच्या नोकरशाही पद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणारी गुप्तहेर संघटना - कामगिरीची सुरुवातीस रशियन संघटनेचा नायनाट - नंतर स्वीडनमधल्या गॉटलँड टापूतील रशियन टोळीकडे मोर्चा - गोटलँडमधील एका स्थानिक राजकारणी महिलेचा मुलगा ताब्यात - कुझनेत्सोव्ह नामक रशियन एजन्टचा पाठपुरावा, इथून पोलंडमधून चोरीला गेलेल्या अमेरिकेच्या मिसाइल्सचा शोध कसा लागला? मॅटरहॉर्न नामक महत्त्वाचा एजन्ट म्हणजे नेमकं कोण? कार्लटन ग्रूपची सगळी गुप्त माहिती शत्रूंच्या ताब्यात जाण्याचा धोका कोणामुळे? कथानकाचा शेवटी घडतं काय? कसं? तीन देश - तीन हल्ले आणि तीन राजनैतिक अधिकार्यांची हत्या अशी पार्श्वभूमी असलेली `स्पायमास्टर` कादंबरी.
-
Don Sant (दोन संत)
रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी या दोन संतांना त्यांच्या आयुष्यात घेऊन आले. या संतांच्या आयुष्यातील वास्तविक चमत्कार म्हणजे त्यांचा चांगुलपणा, त्यांची कणव, तसेच त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणीशी एकरूप. ‘मी’ कोण आहे याचा शोध घेत-घेत कोणी परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मी - देह, हाडे, मांस की मज्जारज्जू? मन की बुद्धी? याचं विश्लेषण करत गेलो की जाणीव होते की, यापैकी काहीही म्हणजे ‘मी’ नाही. या प्रक्रियेला ‘नेति नेति’ म्हणजेच ‘हे नाही’(न±इति) असे म्हणतात. कोणालाही आत्म्याचे आकलन होत नाही, की त्यास स्पर्शही करता येत नाही. तो सर्व गुण किंवा वैशिष्ट्यांविरहित असतो. खरेतर श्री रामकृष्ण यांनी आपल्या भक्तांना मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील ईश्वराची ओळख यातील फरक समजावताना जे शब्द उच्चारले आहेत, ते आपण श्री रमण यांच्या संदर्भात वापरतो. आपण श्री रामकृष्ण-श्री रमण यांच्यासारखे अगदी १०पैशांइतपत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-
Backstage (बॅकस्टेज)
"सिकंदराबादमधील साध्या सुरुवातीपासून नवी दिल्लीतील सत्ताकेंद्रांपर्यंत अहलुवालिया यांच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास मांडणारे हे पुस्तक भारताच्या घडणाऱ्या कथेमागील आतल्या गोटातील नोंद आहे. राज्यनियंत्रित अर्थव्यवस्थेतून बाजारआधारित अर्थव्यवस्थेकडे भारताच्या परिवर्तनात अहलुवालिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तब्बल तीन दशकांपर्यंत ते भारताच्या आर्थिक धोरणनिर्मितीच्या सर्वोच्च पातळीवर कायम प्रभावी राहिले. हे पुस्तक भारताच्या अलीकडच्या इतिहासातील राजकारण, व्यक्तिमत्त्वे, घटना आणि संकटांचा मागोवा घेते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन ते सुधारणा प्रक्रियेतील राजकारण उलगडते आणि धोरणात्मक बदल कसे पुढे नेले गेले हे स्पष्ट करते—सुरुवातीला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात हळूहळू, आणि नंतर १९९१ मध्ये गंभीर देयक तुटीच्या (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) संकटाचा लाभ घेत व्यापक सुधारणांसाठी धाडसी पावले उचलली गेली. या निर्णायक काळात वाणिज्य सचिव आणि वित्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अहलुवालिया यांनी त्या वेळी करण्यात आलेल्या आरोपांना छेद देत ठामपणे मांडले आहे की १९९१ मधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रमाच्या अटींमध्ये समाविष्ट असलेल्या सुधारणा या भारतावर लादलेल्या नव्हत्या, तर त्या देशांतर्गत विचारमंथनातून जन्मलेल्या होत्या. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारच्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी त्या कालखंडातील यश-अपयशाचा सविस्तर आढावा घेतला आहे. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळातील भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वाढीची कहाणी तसेच दारिद्र्यनिर्मूलनातील ऐतिहासिक कामगिरी ते मांडतात. त्याचबरोबर यूपीए-२ च्या अखेरच्या काही वर्षांत दिसून आलेली धोरणात्मक अडचण (पॉलिसी पॅरॅलिसिस) आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही ते स्पष्ट व प्रांजळ चर्चा करतात. विनोदबुद्धी, हलका-फुलका शैली आणि विलक्षण बौद्धिक सामर्थ्य यांच्या संगमातून कथन केलेले ‘बॅकस्टेज’ हे पुस्तक भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अधिकृत योगदान मानले जाते—अशा व्यक्तीकडून, ज्यांना ही कथा सांगण्याची अनन्यसाधारण संधी आणि स्थान लाभले."
-
Anischit (अनिश्चित)
आयुष्याच्या या 'अनिश्चित' प्रवासात आपण अनेक वळणे अनुभवली. कधी प्रेमाची हळुवार साद, तर कधी गुन्हेगारीच्या छायेत लपलेले दाहक वास्तव. ही कथा केवळ एका रहस्याचा उलगडा नव्हती, तर ती होती मानवी स्वभावाच्या विविध पदरांची ओळख. कधीकधी आपण ज्यांना सर्वात जवळचे मानतो, त्यांच्याच मनात सत्याचे कोणते गडद थर दडलेले असतात, हे नियती योग्य वेळ आल्यावरच समोर आणते. भूतकाळातील सावल्या आणि वर्तमानातील संघर्ष यांच्या खेळात शेवटी विजय सत्याचा होतो की केवळ प्रश्न उरतात, हे ज्याचे त्याने आपल्या विवेकाने ठरवायचे असते. ही कथा संपली असली, तरी आयुष्यातील अनिश्चितता आपल्याला दररोज नवनवीन धडे देतच राहील. लेखिका परिचय चित्रा मुडबिद्री या कथेच्या माध्यमातून मानवी नात्यांमधील ओलावा आणि आयुष्यातील अनपेक्षित गुंतागुंत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न लेखिकेने केला आहे. रहस्य, प्रेम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर चालणारी ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेईल, अशी त्यांना खात्री आहे. आपल्या भावना, विचार आणि प्रतिक्रिया लेखिकेसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील.
-
Kahani Magachi Kahani (कहाणी मागची कहाणी)
सिद्धहस्त लेखक गो. नी. दांडेकर यांनी विपुल लेखन केले होते. त्यांची लेखनामागची प्रेरणा काय होती, पुस्तकातील नायिका त्यांना कुठे भेटल्या, भाषेचा विचार ते कसे करायचे ते समजून घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. या लेखसंग्रहातून वाचकांची ही अपेक्षा पूर्ण होते. मी लेखक कसा झालो?, पहिले नाटक, पहिले पुस्तक या संबंधातील माहिती गो. नि. दांडेकर यांनीच लिहिलेल्या लेखांमधून होते. 'शितू ' मधील कोकण यातून भेटते, पडघवली, पूर्णामायची लेकरं, जैत रे जैत, कुणा एकाची भ्रमणगाथा, मृण्मयी, बखर शिवकालाची या लेखांमधून त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, निर्मिलेली पात्रे भेटतात. अखेरीस त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पाही वाचता येतात
-
Majha Bhau Annabhau (माझा भाऊ अण्णाभाऊ)
"माझा भाऊ अण्णाभाऊ" हे शंकर भाऊ साठे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुस्तकाविषयी: या पुस्तकात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात आला आहे. शंकर भाऊ साठे यांनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक व्यक्तिचित्रण या प्रकारात मोडते. पुस्तकाची भाषा मराठी आहे. शंकर भाऊ साठे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याकडून लेखनप्रेरणा घेतली आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवला.
-
Vidyatai Ani (विद्याताई आणि)
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी- रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
-
Vincent Wine Ani Moksha (विन्सेंट वाईन आणि मोक्ष)
थांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली… विन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग… आसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास… विन्सेंट, वाइन आणि मोक्ष ही कादंबरी आहे अमन आणि निशा या प्रेमी जीवांची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या वेदनेची ! दोन अस्सल कलाकार माणसांच्या अस्सल कलेचा आणि अस्सल प्रेमाचा हा ओहोळ आहे. मला कायम वाटत आलंय की, वेदनेने माणसाला कितीही छिन्नविच्छिन्न करून टाकलं तरी एका बिंदूला ती वेदना संपत जाते. मात्र त्या वेदनेतून जी कलानिर्मिती होते ती कायमसाठी टिकून राहते आणि अनेकांना इन्स्पायर करत राहते. माती, पाणी, उजेड, वारा, अंधार, अग्नी, आकाश… साऱ्यांचा मेळ उतरला की उत्तम चित्रपट हाती येतो. तसंच या कादंबरीचं झालंय…!